Take a fresh look at your lifestyle.

बेजबाबदार उबर इंडिया; अभिनेत्री अन्विता फलटणकरला आला कॅब सर्व्हिसचा वाईट अनुभव

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अन्विता फलटणकर आणि सध्याच्या झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘येऊ कशी तशी मी नांदायला’मधील सर्वांची लाडकी स्वीटू सध्या उबर इंडिया कॅब सर्व्हिसेसवर प्रचंड नाराज आहे. अन्विता सोशल मीडियावर अत्यंत सक्रीय असल्यामुळे ती नेहमीच वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करून आपल्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. पण यावेळी अन्विताने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक संताप व्यक्त करणारा अनुभव शेअर केला आहे. एक भली मोठी पोस्ट लिहून तिने उबर इंडियावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत.

स्वीटू उर्फ अन्विता फलटणकर हिने तिच्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने ही पोस्ट शेअर करत संतापजनक असे कॅप्शन दिले आहे. तसेच हि पोस्ट अन्विताने उबर इंडिया आणि उबर ड्रायव्हरला टॅग केले आहे. या पोस्टमध्ये तिने म्हटले की, उबर इंडिया तुमची सेवा खूपच संतापजनक आहे. मी तुमच्या सेवेसोबत निराश झाले आहे. सकाळी ७.१५ वाजता कॅब बुक करण्यासाठी प्रयत्न करत होते. मी ४ वेळा कॅब बुक केली आणि ३ वेळा ती कॅब ८ मिनिटांनंतर कॅन्सल होत होती. प्रत्येक कॅबमागे माझी ८ मिनिटे वाया गेली.

पुढे, अखेर मला कॅब मिळाली आणि मी निघाले. पुढच्या ७ मिनिटांत कंपनीने कॅब कॅन्सल केली आणि मला कॅबमधून उतरवले. हे अत्यंत निराशाजनक आहे. अन्विताला उबर इंडिया या कॅब सर्व्हिसचा खूपच वाईट अनुभव आला आहे. तिच्या या पोस्टवर तिचे चाहतेदेखील मोठ्या संख्येने नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. या पोस्टवर तिच्या एका चाहत्याने म्हटले कि, उबर इंडिया हि अत्यंत बेजबाबदार वागणूक होती. तर अन्य एका युजरने लिहिले की, तिची पूर्ण सकाळ खराब केली. याशिवाय आणखी एका नेटकऱ्याने लिहिले कि, खरंच हे खूपच संतापजनक आहे आणि माझ्यासोबतही असे झाले आहे. उबर इंडियाची सेवा समाधानकारक नाही. एकंदरच स्वीटू म्हणते म्हणून नव्हे तर स्वतःही अनुभव घेतलेले अनेक लोक आहेत, हे या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये दिसत आहे. यानंतर उबर सर्व्हिससाठी एकच सांगणे आहे कि, आता तरी सुधरा.