हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे हि सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. विकी जैनसोबत लग्न झाल्यानंतर अनेकदा ते दोघे एकमेकांसोबतचे फोटो शेअर करताना दिसले. अलीकडे त्यांनी मुंबईतील नव्या घरात प्रवेश केला आहे. यानंतर त्यांच्या नव्या आणि अलिशान घराची सोशल मीडियावर भारी चर्चा होती. यानंतर ते दोघे व्हॅकेशन मूडमध्ये दिसले. पण आता अंकिताने सोशल मीडियावर शेअर केलेली एक पोस्ट चाहत्यांसाठी वेगळ्याच चर्चेचं कारण बनली आहे. चाहत्यांनी लावलेल्या अंदाजानुसार, अंकिता आणि विकीकडे गुडन्यूज आहे.
अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन सध्या व्हॅकेशनमध्ये आहेत. दरम्यान अंकिताने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तीने निळ्या रंगाचा डीपनेक फिटेड गाउन परिधान केलाय. या आऊटफिटमध्ये अंकिता कमालीची सुंदर दिसते आहे. सोबत तिने एक कॅप्शन दिल आहे आणि यामुळे मात्र हे फोटो वेगळीकडे इशारा देत आहेत असं वाटत आहे.
हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी आणि चाहत्यांनी तर कमेंट वर कमेंट करायला सुरुवात केली आहे. नेटकऱ्यांनी अंकिता प्रेग्नंट असल्याचा अंदाज लावत ती बेबी बंप फ्लॉंट करत आहे असं म्हटलं आहे.
View this post on Instagram
दरम्यान, प्रेग्नंसीच्या या चर्चेवर अंकिताने तर अजून कोणत्याही प्रकारची अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र गेल्या काही महिन्यापासून अंकिता शेअर करत असलेल्या फोटोंमुळे वारंवार ती प्रेग्नेंट असल्याचे बोलले जात आहे. मुख्य म्हणजे अलीकडेच, बॉलिवूडची ड्रामाक्वीन राखी सावंतनेदेखील दोघांना गुडन्यूजबद्दल शुभेच्छा दिल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याचं काय आहे.. लग्नाला सहा महिने झाल्यानंतर अंकिताने तिचा पती विकी जैनसोबत काही खास फोटो शेअर केले होते. हेहा फोटो शेअर करत तिने एक असं कॅप्शन लिहिलं कि, त्यामुळे हि चर्चा आणखीच जोर धरतेय, ते कॅप्शन होतं ‘Happy 6 months to us baby’. आता हा बेबी म्हणजे तिचा नवरा कि होणारं बाळ यावरून सोशल मीडियावर जोरदार चर्चाना उधाण आलंय उधाण.
Discussion about this post