Take a fresh look at your lifestyle.

‘अतरंगी रे’ करतोय लव्ह जिहादचा प्रचार?; ट्विटरवर अक्षय-सारा-धनुषच्या चित्रपटावर युजर्सकडून बहिष्कार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच २४ डिसेंबर २०२१ रोजी डिस्नी हॉटस्टार प्लस च्या माध्यमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला अतरंगी चित्रपटावर नेटकऱ्यांनी बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. चित्रपट हिट होण्याआधी BOYCOTT केला जातोय. यामुळे चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद एल राय आणि कलाकार अक्षय कुमार, सारा अली खान, धनुष यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. अनेकांना हा चित्रपट खूप आवडला आहे. त्यांनी चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद दिला असताना ट्विटरवर चित्रपट BOYCOTT करण्याची मागणी ट्रेंडिंगवर आहे. याचे कारण काय ते जाणून घेऊयात.

ओशाळ मीडिया ट्विटरच्या माध्यमातून अनेकांनी या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. या लोकांचे म्हणणे आहे कि, ‘अतरंगी रे’च्या माध्यमातून लव्ह जिहादचा प्रचार केला जात आहे. यामुळे ट्विटरवर ‘बॉयकॉट अतरंगी रे’ हा हॅशटॅग ट्रेंड करतोय. हा ट्रेंड पुढे नेत अनेक युजर्स ट्वीटच्या माध्यमातून चित्रपटाबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. या चित्रपटात अक्षय मुस्लिम युवक तर सारा हिंदू युवतीची भूमिका साकारत आहेत. यात अक्षयचे नाव सज्जाद अली खान आहे आणि साराचे रिंकू रघुवंशी. चित्रपटात साराला रिंकूच्या आईच्याही भूमिकेत दाखवण्यात आले आहे. यात ती सज्जाद अली खानच्या प्रेमात होती. अशा परिस्थितीत चित्रपटातील काही सीनमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचे या निषेध करणाऱ्या लोकांनी म्हटले आहे.

परिणामी ट्विटरवर ‘अतरंगी रे’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होतेय. एका युजरने ट्विट करत लिहिले की, “हिंदी चित्रपट आणि मुस्लिम अभिनेत्याने हिंदू अभिनेत्रीशी लग्न केल्यामुळे लव्ह-जिहादला प्रोत्साहन दिले जातेय. लव्ह जिहाद थांबवायचा असेल, तर सर्वप्रथम हिंदी चित्रपट निर्मितीवर ताबा ठेवावा लागेल.”

याशिवाय आणखी एकाने लिहिले, “बॉलिवुडमध्ये हिंदू धर्माला नेहमी टार्गेट करून प्रसंगी अपमान केला जातो. कारण इतकी वर्षे आपण हे शांतपणे सहन करत आहोत. म्हणूनच ते आपल्याला नम्र आणि दुर्बल समजत आहेत आणि त्यांना हव ते करत आहेत. ” यासोबतच युजरने अनेक वृत्तपत्रांच्या कटिंग शेअर केल्या आहेत.