Take a fresh look at your lifestyle.

‘हा’ अभिनेता करणार दुसरं लग्न? बायकोसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला, आता पुन्हा बदलणार..

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। इंडस्ट्री कोणतीही असो आणि कलाकार कोणताही भाषिक असला तरीही सोशल मीडियावर सक्रिय असतोच. कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संपर्कात राहता येते. शिवाय चाहत्यांनासुद्धा त्यांच्या लाडक्या कलाकारांच्या आयुष्यात नक्की काय घडतंय हे जाणून घेण्यासाठी सोशल मीडिया हा सोयीचा प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे इंडस्ट्रीतील प्रत्येक कलाकार सोशल मीडिया युजर आहे. सध्या सोशल मीडियावर काही तरी अजबी घडतंय. काही सेलिब्रिटीज आपल्या लग्नाचे फोटो शेअर करून होणाऱ्या नव्या बदलाबाबत बोलत आहेत. यापैकी एक म्हणजे मनीष पॉल. त्याने शेअर केलेला फोटो आणि कॅप्शन दोन्हीही सध्या चांगलच चर्चेत आहे.

कॉमिक टायमिंगमध्ये अव्वल असणारा अभिनेता मनीष पॉल याने आपल्या अधिकृत सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने आपल्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे. मुख्य माहिती हि नाहीच मुळी.. मुख्य माहिती तर या फोटोच्या कॅप्शनमध्ये आहे. त्याने या फोटोसोबत एक कॅप्शन दिलं आहे जे वाचून सगळेच बुचकळ्यात पडले आहेत. या कॅप्शनमध्ये मनीषने असं काय लिहिलं आहे कि.. ज्यामुळे चाहत्यांना अनेक प्रश्न पडले आहेत असा सवाल उपस्थित होत साहजिक आहे. पण हे कॅप्शन वाचल्यावर कदाचित तुम्हालाही प्रश्नच पडणार आहे.

मनीष पॉल याने इंस्टाग्रामवर हि पोस्ट शेअर केली आहे आणि याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, सगळं बदललं या दिवसानंतर आणि आता पुन्हा बदलणार आहे.. यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. लग्नाचा फोटो आणि असं कॅप्शन पाहून अनेक चाहत्यांनी तू पुन्हा लग्न करतोयस का..? असा सवाल विचारायची संधी सोडली नाही. एकाने तर कहरच केलाय. दुसरी करतोयस का…? असे विचारत त्याने कमेंट केली. याहीपेक्षा कहर म्हणजे लोकांनी या फोटोवर अभिनंदनपर प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता या कमेंट्स वाचून मनीष खर्च परत लग्न करतो का काय..? असच वाटू लागलं आहे. पण काही चाहत्यांनी मात्र अंदाज लावला आहे कि, हा फोटो आणि कॅप्शन मनीषच्या आगामी प्रोजेक्टचे संकेत देत असावा.