Take a fresh look at your lifestyle.

विकी- कॅटचं लग्न आहे का वेब शो? लग्नाच्या OTT टेलिकास्ट करारावर क्रिटिक्सकडून टीकांचा वर्षाव

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि कॅटरिना कैफच्या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु असून हे दोघेही उद्या लग्नगाठ बांधून आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात करणार आहेत. हे बी टाऊन कपल लवकरच बॉलिवूडचे नवे पॉवर होण्यास सज्ज आहे. संगीत, मेहंदीनंतर आज त्यांची हळद पार पडेल आणि उद्या लग्न. एकीकडे त्यांच्या लग्नाचे व्हिडीओ आणि फोटो पाहण्यासाठी काही चाहते उत्सुक आहेत तर दुसरीकडे काही नेटकरी खिल्ली उडविण्यात व्यस्त आहेत. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, विकी – कॅटच्या लग्नाचे टेलिकास्ट ओटीटी ऍमेझॉन प्राईमवर होणार आहे. यासाठी मोठा करार झाला आहे. यावर सोशल मीडियावर खिल्ली उडविण्याचा कार्यक्रम सुरु झाला आहे.

एकीकडे विकी-कॅटच्या चाहत्यांना लग्नाची प्रत्येक माहिती आणि व्हिडीओ OTTवर पाहायला मिळेल हे ऐकून आनंद होतोय. तर दुसरीकडे नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर हशा पिकवला आहे. मिड-डेच्या वृत्तानुसार, विकी-कॅटने OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime सोबत त्यांच्या लग्नाच्या टेलिकास्ट अधिकारांसाठी करार केला आहे. या करारातुन त्यांनी मोठी कमाई केली आहे. रिपोर्टनुसार हा करार ८० कोटींमध्ये झाला आहे. या करारासाठी विकी- कॅटने त्यांच्या पाहुण्यांकडून NDAवर स्वाक्षरी घेतली आहे. जेणेकरून OTT प्लॅटफॉर्मपूर्वी लग्नाचा कोणताही फोटो वा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होणार नाही.

NDA रिपोर्टनुसार, विकी- कॅटच्या लग्नाचा व्हिडिओ २०२२ मध्ये डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल. यामध्ये त्यांच्या साखरपुड्यापासून लग्नाचे सर्व विधी दाखवले जातील. दुसरीकडे सोशल मीडियावर कुठे कौतुक तर कुठे टीकांचा पाऊस पडतोय. विकी- कॅटच्या लग्नाचा सोहळा ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसणार म्हटल्यावर अनेक टीकाकारांनी हे लग्न आहे कि वेब शो असा सवाल केला आहे. विशेष म्हणजे, २०१९ सालामध्ये, प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी त्यांच्या लग्नासाठी OTT प्लॅटफॉर्मवर एक करार केला होता. यानंतर आता विकी- कॅट कॉपी कॅट झाले आहेत का? असेही म्हटले जात आहे.