Take a fresh look at your lifestyle.

IMDB’च्या टॉप 10 वेब सीरिजच्या यादीत तुमची आवडती वेब सिरीज आहे का?; जाणून घ्या

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण जग मनोरंजनासाठी OTT प्लॅटफॉर्मकडे वळल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनामुळे २ वर्ष चित्रपटगृहे बंद असल्यामुळे घरातल्या घरात मनोरंजनासाठी OTT हा उत्तम पर्याय असल्याचे समोर आले. शिवाय OTT वरील वेब सिरीज विविध भाषांमध्ये उपलब्ध असल्यामुळे संपूर्ण देशातील विविध राज्यांमध्ये त्या पाहिल्या गेल्या आणि लोकांनी या वेब सीरिजला भरभरून प्रेम दिले.

यानंतर आता IMDB (Internet Movie Data Base)ने लोकप्रिय टॉप १० भारतीय वेब सिरीजची यादी जाहीर केली आहे. चला तर जाणून घेऊयात तुमची आवडती वेब सिरीज देशाची आवडती आहे का ते खालीलप्रमाणे:-

१) अ‍ॅस्पिरीटस – या यादीमध्ये सर्वात पहिला क्रमांक लागतो तो अ‍ॅस्पिरीटस या वेब सिरींजचा. या सिरीजमध्ये UPSCची तयारी करणाऱ्या तीन मित्रांची कहाणी दाखवण्यात आलेली आहे. यासाठी त्यांना कोणत्या अडचणी येतात, त्यातून ते कसा मार्ग काढतात हे दाखवण्यात आले आहे.

२) धिंडोरा – या यादीमध्ये दुसरा क्रमांक लागतो तो धिंडोरा या वेब सिरीजचा. या वेब सिरीजची कथा धिंडोरा भुवन या व्यक्तीच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या दैनंदिन जीवनाभोवती फिरताना दिसते.

३) द फॅमिली मॅन – या लिस्टमध्ये द फॅमिली मॅन या सिरीजचा तिसरा क्रमांक लागतो. या सीरिजमध्ये मनोज बाजपेयी प्रमुख भूमिकेत आहे. या सिरीजमध्ये मनोज बाजपेयी राष्ट्रीय तपास संस्थेत कामाला आहे. तो आपली गुप्त नोकरी आणि घर कशाप्रकारे सांभाळतो हे दाखवण्यात आले आहे. या सीरिजचे आतपर्यंत 2 सीजन आले आहेत.

४) द लास्ट हवर – या यादीत द लास्ट हवर या सिरीजचा चौथा क्रमांक लागतो. यामध्ये प्रेम आणि आपले कर्त्यव्य यांचे कॉमबिनेशन दाखवले आहे.

५) सनफ्लॉवर – या यादीत सनफ्लॉवर या सिरीजचा पाचवा नंबर लागतो. या सिरीजमध्ये सनफ्लॉवर नावाच्या गृहनिर्माण संस्थेमध्ये एका विचित्र हत्येचे रहस्य दाखवले आहे.

६) कँडी – या यादीत कँडी या वेब सिरीजचा सहावा नंबर लागतो. या सिरीजमध्ये एका विद्यार्थ्याचा खून झालेला असतो. या खुनाचा तपास पोलीस रत्ना संखावर आणि या विद्यार्थ्याचे शिक्षक करतात. यामध्ये कोणकोणत्या रहस्यांचा उलघडा होतो ते दाखवण्यात आले आहे.

७) रे – या यादीत रे या वेब सिरीजचा सातवा नंबर लागतो. या वेब सिरीजमध्ये प्रसिद्ध लेखक सत्यजित रे यांनी लिहिलेल्या चार लघुकथा यामध्ये साकारण्यात आल्या आहेत.

८) ग्रहण – या यादीत ग्रहण या वेब सिरीजचा आठवा नंबर लागतो. या वेब सिरीजची कथा IPS अधिकारी अमृता सिंगने भूतकाळाला तिच्या वर्तमानाशी जोडणारे एक रहस्य उलघडले आहे.

९) नोव्हेंबर स्टोरी – या यादीत नोव्हेंबर स्टोरी या सिरीजचा नववा नंबर लागतो. अल्झायमरने ग्रस्त एक ख्यातनाम गुन्हेगारी कादंबरीकार एका खुनाच्या ठिकाणी सापडतो आणि या प्रकरणात अडकतो. यामध्ये त्याला वाचवणाऱ्या त्याच्या मुलीची कथा दाखवण्यात आली आहे.

१०) मुंबई डायरी 26/11 – या यादीत मुंबई डायरी 26/11 या सिरीजचा दहावा नंबर लागतो. या सिरीजमध्ये 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या आतंकवादी हल्ल्याबद्दल दाखवण्यात आले आहे.