Take a fresh look at your lifestyle.

RSS’ची तालिबानसोबत तुलना करणे अयोग्य; जावेद अख्तरांच्या वक्तव्यावर सामनातून टीकांचा प्रहार

0

हॅलो बॉलीवुड ऑनलाइन| प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना ही अफगाणिस्तान मधील तालिबान्यांशी केल्यानंतर नवा वाद निर्माण झाला. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून जावेद अख्तर यांना खडबोल सुनावलं आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तालिबानशी केलेली तुलना आम्हाला मान्य नाही,’ अशा शब्दांत शिवसेनेनं जावेद अख्तर यांच्यावर निशाणा साधला आहे.

तालिबानचे हे कृत्य रानटी असून ते निंदनीय आहे. त्याप्रमाणे आरएसएस, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे समर्थन करणाऱ्यांची मानसिकता तालिबानी प्रवृत्तीची आहे, या विचारधारेचे समर्थन करणाऱ्या लोकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे,’ असे मत ज्येष्ठ कवी लेखक जावेद अख्तर यांनी मांडले आहे व त्याबद्दल काही लोकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली आहे, असं शिवसेनेनं म्हटलं आहे. संघ आणि तालिबानसारख्या संघटनांच्या ध्येयामध्ये कोणताही फरक नसल्याचे त्यांचे म्हणणे सर्वस्वी चूक आहे असे शिवसेनेने म्हंटल आहे.

जावेद अख्तर हे त्यांच्या सडेतोड वक्तव्यांबद्दल प्रसिद्ध आहेत. या देशातील धर्मांधता, मुस्लिम समाजातील धर्मांध अतिरेकी विचार, राष्ट्राच्या मुख्य प्रवाहापासून फटकून वागण्याचे धोरण अशा अनेक गोष्टींबद्दल जावेद यांनी सतत कठोर प्रहार केले आहेत. देशात जेव्हा-जेव्हा धर्मांध, राष्ट्रद्रोही विकृती उसळून आल्या त्या प्रत्येक वेळी अख्तर यांनी त्या धर्मांधांचे मुखवटे फाडले आहेत. धर्मांधांची पर्वा न करता त्यांनी ‘वंदे मातरम्’चे गायण ही केले आहे. तरीही संघाची तालिबानशी केलेली तुलना आम्हाला मान्य नाही,” असं सामनाच्या अग्रलेखामध्ये म्हटलं

Leave A Reply

Your email address will not be published.