Take a fresh look at your lifestyle.

स्वरकोकिळा लता मंगेशकर यांना ITBP जवानाने वाहिली स्वरांजली

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राष्ट्राचा आवाज आणि स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी आज निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण जगावर शोककळा पसरली आहे. लता दीदींच्या निधनामुळे मंगेशकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर संगीत सृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. लता दीदी या स्वरांच्या पक्क्या होत्या. त्यांच्या सुमधुर आवाजाने त्यांनी ५० हजारांहून अधिक गाणी गाऊन चाहत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. त्यांनी गायलेले ‘ए मेरे वतन के लोगो’ हे गाणे ऐकल्यावर डोळ्यातून टचकन पाणी आले नाही असे होत नाही. आज त्यांच्या निधनानंतर त्यांना पोलीस आणि लष्करी पथकांनी सलामी दिली आहे. तर एका ITBP जवानाने दीदींना स्वरांजली वाहिली आहे.

लता दीदींच्या सुमधुर आवाजातील ‘ए मेरे वतन के लोगों’ हे गाणे जेंव्हा वाजते तेंव्हा एक मधुर धुन कानी पडते आणि यानंतर डोळ्यात टचकन पाणी येत. उर भावनेने भरतो आणि मनात देशाप्रती प्रेमाची अविरत ज्योत धगधगू लागते. यामुळे त्यांचे हे गाणे देशभरात इतके प्रसिद्ध आहे की, हे गाणे ऐकून प्रत्येक भारतीय त्यात हरवून जातो. याच गाण्याशी संबंधित एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये एका ITBP जवानाने भारतरत्न लता मंगेशकर यांना त्यांच्या खास शैलीत श्रद्धांजली वाहिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता कि, एका ITBP जवानाने ‘ए मेरे वतन के लोगो’ हे गाणे ट्रम्पेटवर वाजवले आहे. हीच ती स्वरांजली लता दीदींसाठी आदरांजली! एक दोन नव्हे तर ३६ भाषांमध्ये विविध भावनांची गाणी गाऊन मनमानावर राज्य करणाऱ्या लता दीदी यांचे आज निधन झाल्यामूळे संपूर्ण जगात राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. लता दीदींच्या पार्थिवावर अगदी काहीच वेळात मुंबईतील दादर येथे शिवाजी पार्कवर शासकीय इतमामात अंत्य संस्कार पार पडणार आहेत.