Take a fresh look at your lifestyle.

‘हे अविश्वसनीय आहे’; ‘पावनखिंड’ चित्रपटाबाबत रितेश देशमुखने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। शिवजयंतीच्या मुहूर्तावर पावनखिंड या चित्रपटाचे प्रदर्शन झाले. यानंतर हा चित्रपट केवळ एक चित्रपट राहिला नाही. तर हा चित्रपट प्रेक्षकवर्गासाठी एक पर्वणी ठरला आहे. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता दिग्पाल लांजेकर यांच्या ‘शिवराज अष्टक’ या संकल्पनेतून पडद्यावर आलेल्या ‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटांनंतर ‘पावनखिंड’ हा तिसरा महत्त्वाचा चित्रपट आहे. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून भरभरून प्रेम आणि पसंती मिळताना दिसत आहे. यानंतर आता अभिनेता रितेश देशमुखने पावनखिंड चित्रपटाबाबत प्रतिक्रिया देताना एक ट्विट केले आहे. हे ट्विट सध्या चर्चेत आहे.

अभिनेता रितेश देशमुख याने अधिकृत सोशल मीडिया ट्विटर हॅण्डलवरून एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये रितेशने लिहिले आहे कि, ‘हे अविश्वसनीय आहे. पावनखिंडच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा. थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहणाऱ्या मराठी प्रेक्षकांचे खूप खूप आभार’. या ट्विटवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर प्रतिक्रिया देणाऱ्यांमध्ये अनेक प्रेक्षक असे आहेत ज्यांनी पावनखिंड पहिला आहे किंवा ज्यांना पावनखिंड पाहायचा आहे. रितेशच्या या ट्विटवर प्रतिक्रिया देताना काही नेटकऱ्यांनी ‘पावनखिंड’ हा चित्रपट हिंदीतही प्रेक्षकांच्या भेटीला आणा, अशी मागणी केली.

त्याचसोबत चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनीही ‘पावनखिंड’च्या कमाईचा आकडा पोस्ट केला आहे. ‘पावनखिंड’ने पहिल्या आठवड्यात १२.१७ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. दुसऱ्या वीकेंडला इतर मोठ्या चित्रपटांची टक्कर असतानाही ‘पावनखिंड’ने जबरदस्त कमाई केली. दुसऱ्या वीकेंडमध्ये शुक्रवारी १.०२ कोटी रुपये, शनिवारी १.५५ कोटी रुपये तर रविवारी १.९७ कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने केली. पहिला आठवडा आणि दुसरा वीकेंड मिळून ‘पावनखिंड ने १६.७१ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटावर सर्व क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाच्या १५३० शोजने चित्रपटगृह गाजवले आहेत.