Take a fresh look at your lifestyle.

‘मराठीतून सांगितलेलं कळत नाही..’ जॅकलिनच्या तोंडी आर्चीचा डायलॉग; पहा व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘मराठीतून सांगितलेलं कळत नाही..’ हा डायलॉग म्हटला कि अगदी लहान मुलंसुद्धा सांगतात कि हा तर आर्चीचा फेमस डायलॉग आहे. कारण सैराटचे असे अनेक डायलॉग आहेत जे हिट आहेत. अशात जर कुण्या बॉलिवूड अभिनेत्रीने एखादा डायलॉग म्हटलाच तर चर्चा होणारच.. नाही का..? असेच काहीसे आता झाले आहे. बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने चक्क आर्चीचा हा फेमस डायलॉग म्हटला आहे. याचा व्हिडीओ रील मेकर करन सोनावणे याने शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Sonawane (@focusedindian)

अभिनेता जॉन अब्राहम, जॅकलिन फर्नांडिस, रकुल प्रीत सिंग स्टारर ‘अ‍ॅटॅक’ हा सिनेमा १ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शित झाला. या सिनेमाची स्टारकास्ट विविध प्लॅटफॉर्म्सवर ‘अ‍ॅटॅक’ या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. दरम्यान या चित्रपटातील अभिनेत्री जॅकलिन हिचा मराठमोळा डायलॉग म्हणतानाच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये तीने नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपटातील ‘मराठीतून सांगितलेलं कळत नाही, इंग्लिशमध्ये सांगू का?’ हा अभिनेत्री रिंकू राजगुरूचा गाजलेला डायलॉग म्हटलं आहे.

या व्हिडिओमध्ये जॅकलिन हा डायलॉग बोलताना दिसतेय. तिचे अस्खलित मराठी ऐकून तिच्या चाहत्यांना आश्चर्य वाटणे साहजिक आहे. पण मुलगी शिकली प्रगती झाली हेच खरं. सध्या ‘अ‍ॅटॅक’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी या चित्रपटाची टीम लाइव्ह इव्हेंट्समध्ये, रिअ‍ॅलिटी शो तसेच सोशल मीडियावर वेगवेगळ्या पद्धतीने प्रमोशन करत आहे. जॅकलिनच्या या व्हिडिओमध्ये रकुलसुद्धा आहे. हा व्हिडीओ Focusindian अर्थात करण सोनावणे या कंटेट क्रिएटरने त्याच्या इन्स्टा पेजवर शेअर केलाय. हा व्हिडीओ विनोदीरित्या बनविण्यात आला आहे.