Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘जग्गू आणि जुलिएट’ची थेटरात हवा; प्रेक्षकांकडून चित्रपटाला जबरस्त प्रतिसाद

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 14, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Jaggu ani Juliet
0
SHARES
62
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या मराठी चित्रपटसृष्टीत फक्त ‘जग्गु आणि जुलिएट’चीच चर्चा ऐकू येत आहे. १० फेब्रुवारीला प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या अतिशय पसंतीस पडला आहे, हे हाऊसफुल थिएटर्स बघूनच लक्षात येतंय. पुनित बालन स्टुडिओज् प्रस्तुत ‘जग्गु आणि जुलिएट’ या चित्रपटात अमेय वाघ आणि वैदेही परशुरामी यांच्या मुख्य भूमिका आहेत. प्रेमाचे वेगवेगळे अंग उलगडणारं कथानक आणि चित्रपटातील उत्तराखंडमधील मनोहारी दृश्य यांमुळे चित्रपट अधिकच चर्चेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Punit Balan Studios (@punitbalanstudios)

‘जग्गु आणि जुलिएट’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज झाल्यापासूनच हा चित्रपट कसा असेल याचा अंदाज बांधला जात होता. मात्र, प्रेक्षक ज्या भरघोस पद्धतीने चित्रपटाला प्रतिसाद देत आहेत, त्यावरून असं दिसून येतंय की, चित्रपट मराठी प्रेक्षकांनी या चित्रपटाला आपली पसंती दिली आहे. या चित्रपटात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यामुळे तो लोकप्रिय होतोय.

View this post on Instagram

A post shared by Punit Balan Studios (@punitbalanstudios)

अजय-अतुलची म्युझिकल ट्रीट, दिग्दर्शक महेश लिमये यांचं नयनरम्य छायांकन आणि दिग्दर्शन आणि चित्रपटातील तगडी स्टारकास्ट य़ामुळे चित्रपटाला गर्दी होत आहे. तसेच चित्रपटातील सेलिब्रेटीही थिएटर्समध्ये जाऊन प्रेक्षकांना भेटत आहेत. ‘भावी आमदार’ या गाण्यावर प्रेक्षक ठेका धरत आहेत. कुटुंबातील सर्वजण हा चित्रपट आनंदाने एंजॉय करत आहेत, आणि स्वतःला शोधू पाहात आहेत.

View this post on Instagram

A post shared by Punit Balan Studios (@punitbalanstudios)

अमेय-वैदेहीसोबतच ऋषिकेश जोशी, उपेंद्र लिमये, प्रविण तरडे, मनोज जोशी, समीर धर्माधिकारी, समीर चौघुले, अविनाश नारकर, सुनिल अभ्यंकर, सविता मालपेकर, रेणूका दफ्तरदार, अभिज्ञा भावे, अंगद म्हसकर, जयवंत वाडकर, केयुरी शाह अशा जबरदस्त कलाकारांची फौज चित्रपटात दिसत आहे, त्यामुळे मल्टिस्टारर चित्रपटाचा आनंद प्रेक्षकांना पुन्हा एकदा मिळणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)

‘पुनीत बालन स्टुडिओज्’ने यापूर्वी निर्मिती केलेला सामाजिक विषयावरील ‘मुळशी पॅटर्न’च्या सुपरहिट यशानंतर आता ‘जग्गू आणि जुलिएट’च्या रूपात नवीकोरी रोमँटिक लव्हस्टोरी प्रदर्शित झाली आहे. पुनीत बालन स्टुडिओज् निर्मित, अजय-अतुल म्युझिकल आणि महेश लिमये यांच्या दिग्दर्शनाची आणि कॅमेऱ्याची जादू दाखवणारा ‘जग्गु आणि जुलिएट’ नक्की बघा!

Tags: Amey waghInstagram PostJaggu ani JulietMarathi MoviePunit Balan StudiosVaidehi ParshuramiViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group