Take a fresh look at your lifestyle.

यंदाच्या Oscar’साठी ‘जय भीम’ आणि ‘मरक्कर’ भारताचे प्रतिनिधित्व करण्यास सज्ज

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड साइंसेजकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही ऑस्कर अवॉर्डसाठी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात २७६ सिनेमांची नावे आहेत. ऑस्करकडून विविध श्रेणीतील चित्रपटांची नावे शॉर्टलिस्ट केली आहेत. यामध्ये भारताच्या २ सर्वांत्तम सिनेमांची नावे समाविष्ट आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मोहन लाल स्टारर एक्शन एडवेंचर सिनेमा ‘मरक्कर: द लॉयन ऑफ द अरेबियन सी’ आणि सूर्या स्टारर ‘जयभीम’ हे तमिळ सिनेमा या यादीमध्ये शॉर्टलिस्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा हे २ सिनेमे ऑस्करमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.

मरक्कर हा सिनेमा नेव्ही चिफ मोहम्मद अली उर्फ कुंजलि मरक्कर यांच्या जीवनावर आधारित आहे. तर जय भीम हा सिनेमा आदिवासी लोकांच्या हक्कांवर भाष्य करणारा सिनेमा आहे. हे दोन्ही सिनेमे सत्य घटनांवर आधारीत असून ओटीटीवर पाहता येत आहेत. दरम्यान ९४व्या ऑस्कर पुरस्कारांच्या सर्व पात्र सिनेमांसाठी २७ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यातून अंतिम नामांकनांची घोषणा ८ फेब्रुवारी रोजी केली जाईल. यंदाचा ऑस्कर लॉस एंजिल्समध्ये डॉल्बी थिएटरमध्ये पार पडेल. रिपोर्टनुसार, ९४वा ऑस्कर अवॉर्ड २७ मार्चला पार पडणार आहे. त्याप्रमाणे यंदाच्या ऑस्करमध्ये पात्र यादीत मागच्या वर्षांच्या यादीहुन कमी सिनेमांची नावे आहेत. मागील वर्षी एकूण ३९९ तर यावर्षी २७६ सिनेमा या यादीत आहेत.

जय भीम हा तमिळ सिनेमा असून त्याने रिलीजपासून नवीन रेकॉर्ड तयार केले आहेत. प्रेक्षकांनी जय भीम चित्रपटाला प्रत्येक भाषेत प्रेम दिले आहे. त्यामुळे हा सिनेमा आता ऑस्करच्या शर्यतीत आहे. त्याचप्रमाणे ऑस्करच्या यूट्यूब चॅनेलवर दिसणारा जयभीम हा पहिला भारतीय सिनेमा ठरला आहे. IMDbवर या सिनेमाला ९.६ रेटींग मिळाले आहे. तर मरक्कर या मल्याळम अँक्शन सिनेमाने गेल्या वर्षी ६७व्या राष्ट्रीय पुरस्कारात सर्वात्कृष्ट फिचर फिल्मसह ३ राष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत. तत् अभिनेता मोहनलाल मुख्य भूमिकेट तर अभिनेता अर्जुन सरजा, सुनील शेट्टी, प्रभुदेवा, प्रभू, मंजू वारियर, कीर्ति सुरेश आणि कल्याणी प्रियदर्शन अशी तगडी स्टारकास्ट आहे.