Take a fresh look at your lifestyle.

‘जेम्स बॉण्ड 007’ इज बॅक !

0

टीम, हॅलो बॉलीवूड | धमाकेदार ऍक्शन, सुंदर ललना, अद्ययावत गन्स, आलिशान गाड्या आणि जगप्रसिद्ध गुप्तहेर जेम्स बॉण्ड. त्याच्या चित्रपटाच्या चाहत्यांना हे सर्व पुन्हा अनुभवता येणार आहे तेही आणखी मोठ्या स्तरावर. जेम्स बॉण्ड सिरीज मधला बहुचर्चित आणि प्रतिक्षीत पुढचा भाग येऊ घातलेला आहे, ‘नो टाइम टू डाय’. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचं पोस्टर आणि १५ सेकंदाचा टीजर रिलीज झाला होता. थोड्याच वेळापूर्वी चित्रपटाचा ट्रेलर यूट्यूबच्या माध्यमातून जगभरात रिलीज केलेला आहे.

डॅनियल क्रेग पुन्हा एकदा बॉण्डच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये श्वास रोखून ठेवायला लावणारे स्टंट्स, नयनरम्य लोकेशन्स, खिळवून ठेवणारी सिनेमॅटोग्राफी, आकर्षक गाड्या आणि बॉण्डला साजेशे लक्षवेधक डायलॉग्स लोकांची वाहवा मिळवत आहेत. चित्रपट पहिला युकेमध्ये ३ एप्रिल आणि नंतर भारतात ८ एप्रिल २०२० रोजी रिलीज होणार आहे.

डॅनियल क्रेग यांचा ‘जेम्स बॉण्ड’ म्हणून हा शेवटचा चित्रपट असणार आहे. बॉण्ड सिरीज मधला हा साधारण ३३वा चित्रपट आहे. या चित्रपटाकडून सर्वानाच खूप अपेक्षा असून याच वर्षीचा ब्लॉकबस्टर ‘जोकर’ चित्रपटाचे सर्व बॉक्स ऑफिस रेकॉर्डस् मोडण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: