Take a fresh look at your lifestyle.

खोया खोया चाँद; जान्हवीच्या मोहक सौंदर्याचा सोशल मीडियाला सोसेना भार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कमी वयात मोठं यश संपादन करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये जान्हवी कपूर हे नाव आवर्जून घेतले जाते. अतिशय वेगाने कमी वेळात जान्हवीने आपले नाव इंडस्ट्रीच्या महत्वपूर्ण यादीत समाविष्ट केले आहे. जान्हवी कपूरचा चाहता वर्ग आघाडीच्या अभिनेत्रींसारखाच खूप मोठा आहे. त्यात जान्हवी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात अगदी सहज राहते. अनेकदा ती आपले विविध फोटो, व्हिडीओ आणि आगामी प्रोजेक्टची माहिती सोशल मीडियावर देताना दिसते. सध्या तिचे ब्लॅक अँड व्हाईट साडीतील फोटो सोशल मीडियावर कहर करत आहेत.

अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ‘गुड लक जेरी’ हा तिचा नवा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. त्यामुळे आधीच जान्हवी सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह झाली आहे. दरम्यान जान्हवी कपूरने इंस्टाग्रामवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो तिने अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्रामवर आपल्या चाहत्यांसह शेअर केले आहेत. या फोटोत जान्हवीने साडी परिधान केली आहे. अतिशय सुंदर अशी डिझायनर साडी परिधान करीत केलेलं हे फोटोशूट ब्लॅक अँड व्हाईट कलरमध्ये रिलीज केले आहे. या फोटोवर तिचे चाहते आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने कौतुकपर कमेंट करताना दिसत आहेत.

या फोटोसह जान्हवीने कॅप्शनमध्ये लिहिलंय कि, #जेरीला एव्हढ्या प्रेमाने आपलंस केल्याबद्दल धन्यवाद! सध्या अभिनेत्री जान्हवी कपूर ‘गुड लक जेरी’च्या प्रमोशनसाठी विविध फंडे आजमावत आहे. या चित्रपटात ती ड्रग्जची तस्करी करताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलरसुद्धा रिलीज झाला. जो प्रेक्षकांना खूप आवडला आहे. हा चित्रपट जान्हवीच्या करिअरमधील एक मोठा चित्रपट ठरेल, असे समीक्षक मानत आहेत. माहितीनुसार, ‘गुड लक जेरी’ हा २०१८ साली रिलीज झालेल्या तमिळ चित्रपट ‘कोलामावू कोकिला’चा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.