Take a fresh look at your lifestyle.

..विचार ठीक पण निवड अयोग्य! मोदींच्या निर्णयावर अख्तरांनी केली टीका; ट्विट झाले व्हायरल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या २३ जानेवारी रोजी स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाष चंद्र बोस यांची १२५ वी जयंती होती. आपल्या देशासाठी नेताजी आणि अन्य प्रत्येक स्वातंत्र्य सेनानी आन बान आणि शान आहेत हे आपण सारेच जाणतो. यानंतर नेताजींच्या जयंती दिनाचे औचित्य साधून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया गेटवर नेताजींचा पुतळा उभारणार याची घोषणा केली. त्यावर बॉलिवूड इंडस्ट्रीतील नावाजलेले गीतकार जावेद अख्तर यांनी आपले मत मांडताना या विचारावर प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे. गीतकार जावेद अख्तर यांनी आपले मत मांडताना नेताजींच्या पुतळ्याची जागा योग्य नाही असे म्हटले आहे. यामुळे सर्वत्र गदारोळ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

जावेद अख्तर यांनी सोशल मीडिया ट्विटरच्या माध्यमातून आपले मत जगजाहीर केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “नेताजी यांच्या पुतळ्याचा विचार तर ठीक आहे. परंतु पुतळ्याची निवड योग्य नाहीये. या पुतळ्याभोवती गर्दी राहिल आणि पुतळा नेहमी सॅल्युट करताना दिसेल. हे त्यांच्या प्रतिष्ठेला शोभत नाही. एक तर तो पुतळा बसलेला पाहिजे होता नाहीतर हवेत हात फिरवून घोषणा देताना पाहिजे होता.” जावेद अख्तर यांनी केलेल्या या ट्विटमध्ये सर्वस्वी त्यांचे मत असले तरी आताच संपूर्ण जग डिजिटल आहे हे मान्य करायला हवे. त्यामुळे अनेकांनी त्यांच्या मताला फाटे फोडले आहेत.

जावेद अख्तर यांनी लिहिलेल्या ट्विटवर अनेक लोक अनेक प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका व्यक्तीने ट्विटवर रिप्लाय देताना लिहिले कि, “जावेद सर, प्लीज एकदा हे देखील म्हणा की, दिवसातून पाच वेळा नमाज करण्याचा विचार देखील ठीक आहे पण लाऊड स्पीकरचा वापर करणे योग्य नाही. नमाज एक वेगळी गोष्ट आहे आणि ही गोष्ट कोणताही दंगा न करता घराच्या आता केला पाहिजे. खरतर जावेद अख्तर आणि वादग्रस्त वक्तव्य यांचं एक अतूट नातं तयार झालं आहे. यामुळे अनेकदा ते असं काही ना काही बोलताना दिसतात. त्यानंतर वादाच्या भोवऱ्यातही सापडतात.