Take a fresh look at your lifestyle.

रशिया- युक्रेन युद्धाचा नववा दिवस; जावेद अख्तर म्हणाले, मला विश्वास आहे कि..

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जगभरातील अत्यंत महत्वाच्या दोन देशांमध्ये अतिशय वाईट पद्धतीने युद्ध सुरु आहे. हे दोन देश म्हणजे रशिया आणि युक्रेन. रशिया- युक्रेन युद्धामुळे जगभर अस्वस्थता निर्माण झाली आहे. याचे कारण म्हणजे या युद्धात अनेक रशियन आणि युक्रेनियन नागरिकांनी आपले प्राण गमवावे आहेत. मुख्य म्हणजे यात काही भारतीय विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. याबाबत सगळीकडे बोललं जातं असताना आता बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनीही रशिया युक्रेन युद्धावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भारतीय विद्यार्थी लवकरच सुखरूप परत येतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

आज पुणे येथील इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवलमध्ये जावेद अख्तर यांनी विविध विषयांवर वक्तव्य करताना रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाविषयी देखील आपले मत मांडले आहे. “जगाच्या पाठीवर कुठेही युद्ध होऊ नये. कारण युद्धात निष्पापांचा बळी जातो. युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी अडकल्याची माहिती आहे. पण मला विश्वास आहे की सगळे परत सुखरूप परत येतील”, असं यावेळी जावेद अख्तर म्हणाले आहेत. याशिवाय अनेक विविध विषयांवर जावेद अख्तर यांनी आपले मत मांडले आहे. याआधी २४ फेब्रुवारी रोजी जावेद अख्तर यांनी एक ट्विट केले होते जे चांगलेच चर्चेत होते.

यात त्यांनी लिहिले होते कि, जर रशियन / युक्रेनियन संघर्षाने न्याय आणि न्यायाची भावना, त्यांच्यातील दुर्बलांचे संरक्षण करण्याची मानवी इच्छा जागृत केली तर, येमेनसारख्या छोट्या देशावर सौदीच्या कार्पेट बॉम्बस्फोट आणि अत्याचारांबद्दल सर्व पाश्चिमात्य शक्ती पूर्णपणे उदासीन का आहेत? सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा नववा दिवस आहे. या युद्धात आतापर्यंत मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि जीवित हानी झाल्याचे दिसून आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार युक्रेनमध्ये मोठ्या संख्येत भारतीय आहेत आणि त्यांच्या जीवालाही धोका असल्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. मात्र सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करून भारतीयांना त्यांच्या मायदेशी आणण्याच्या प्रयत्नांत आहेत.