पंचनामा | जवानी जानेमन नावावरून कितीही रटाळ वाटत असला तरी चित्रपटाचा विषय वेगळा आणि रंजक आहे.
एक चाळीशीतला पुरुष जॅझ, जो लंडनमध्ये रिअल इस्टेट ब्रोकर आहे आणि ज्याला तरुणांसारखं अय्याशी करत एकटं राहायला आवडतं, अचानक एक एकवीस वर्षाची मुलगी तिया, त्याला भेटून मी तुझीच मुलगी असल्याचे सांगते, त्यांचे DNA रिपोर्ट्स ही पॉझिटीव्ह येतात. पण मोठी गोष्ट ही आहे की तिया प्रेग्नंन्ट आहे. आता जॅझचा स्ट्रगल सुरू होतो आपलं वय, शरीर, जुनं आणि नवीन अशी दोन्ही कुटुंब आणि आपण आजोबा होणार आहे हे ऍक्सेप्ट करण्याचा. त्यात मध्ये बऱ्याच इंटरनल आणि एक्सटर्नल गोष्टी घडतात
चित्रपटाची गोष्ट नवीन आहे पण मांडणी तीच वाटते, नितिन कक्कर यांनी सांगितलेली गोष्ट छोटे छोटे सुरप्राइझ घेऊन येते खरी पण. तइ हळुवार पणे पुढे न सरकता धक्के खात पूढे जाते. आणखी एक वाईट वाटतं की चित्रपटाचा शेवट पुन्हा धर्मा छाप एअरपोर्टवर होतो, या बॉलीवूड वाल्यांना त्याचं काय कौतुक आहे कळत नाही. पण धर्मा सारखा स्लो मोशन ड्रामा टाकल्यामुळे दिग्दर्शकाचं कौतुक.
अशा फास्ट पेस वाल्या चित्रपटात गरजेचे असतात तेवढेच स्मार्ट डायलॉग्ज जे इथे अजिबात दिसत नाहीत, नाहीतर चित्रपट कुठल्या कुठे गेला असता.
चित्रपटाचे बॅकग्राउंड म्युझिक खास नाहीये, त्यात जास्त करून पब मधलीग गाणी आणि बिट्स आहेत, गाणीही ठिक ठाकच आहेत. लक्षात नाही राहात, तसेच चित्रपटाचे पेस चांगले मेंटेन झाले असले तरी सिनेमॅटोग्राफी आणि एडिटिंग ही सुमार दर्जाची वाटते, पण ते तरी काय करतील, कारण दिग्दर्शक हाच शेवटचा एडिटर असतो
अभिनायमध्ये सैफने चांगलाच फ्लो पकडलेला दिसतो, त्याच्या खऱ्या स्वभावाला साजेसं पात्र आहे, जॅझची भाषा, देहबोली त्याने चांगली पकडली आहे. पण आपण त्याला या अवतारात कॉकटेल मध्ये थोडं पाहिलंय. आलाया एफ ट्रेलर प्रमाणेच इथे पण अबोव्ह एव्हरेज म्हणता येईल पण तिला भविष्यात खूप संधी मिळतील असे वाटतं. यांच्या सोबत असलेल्या कुब्राने आणि तब्बूने आपली छाप सोडलेली जाणवते.
थोडक्यात चित्रपट चांगली वेगळी गोष्ट सांगतो. बऱ्यापैकी जमलीय पण यामध्ये अजून खूप संधी होत्या गोष्ट अजून प्रभावी बनवण्याचा. असो एक चांगला विषय चांगला हाताळला नाही, ही खंत. सैफ आपल्याला गोष्टीत धरून ठेवतो, आलाया एफ ला तिच्या आईपेक्षा नक्कीच चांगलं फ्युचर आहे. चित्रपट एकदा बघावा असा नक्कीच आहे
रेटिंग – 3/5