Take a fresh look at your lifestyle.

म्हणुन जेनेलियाला आवडतो हत्ती

मुंबई | बाॅलिवुड अभिनेत्री जेनेलिया डिसुझाने हत्तीसोबतचा एक फोटो आपल्या इंन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यावेळी आपल्या प्राणी आवडत असल्याचे सांगत हत्ती सर्वांत सुंदर प्राणी असल्याचे जेनेलियाने म्हटलंय.

प्राणी खरंच खूप अमॅझिंग असतात. प्राण्यांना प्रेम कसं करायचं ते माहिती असते असं जेनेलियाने म्हटले आहे. प्राणी आवडणार्‍या मुलींपैकी मी एक आहे. प्राण्यांमध्ये मला हत्ती प्रचंड आवडतो. कारण हत्ती सर्वात सुंदर प्राणी आहे असे जेनेलियाने म्हटले आहे. जेनेलिया सध्या रितेश सोबत उत्तर भारत फिरत आहे. जयपूर येथील अभयारण्यातील एक व्हिडिओ देखील रितेशने शेअर केला असून आपण नवीन वर्ष एन्जाॅय करत असल्याचं रितेशने म्हटले आहे.

दक्षिन भारतात हत्तींचे प्रमाण जास्त आहे. हत्ती हा सर्वात हुशार प्राणी असल्याचे बोलले जाते. तसेच हत्ती हा प्रेमळसुद्धा असतो. हत्तीच्या प्रेमळपणामुळेच जेनेलियाला हत्ती आवडतो असे जेनेलियाने म्हटले आहे.

Comments are closed.

%d bloggers like this: