पिच्चर अभी बाकी है । अखेर बऱ्याच काळानंतर ‘झुंड’ या नागराज मंजुळे आणि सुपरस्टार बच्चन यांच्या मुव्हीचा टीजर का होईना पण बाहेर पडला. ८ मे रोजी अख्खा पिच्चर रिलीज होणार असल्याचे त्यात नमूद आहे.
१ मिनिटाच्या टिजर मध्ये सुरवातीला बच्चन आपल्या सिनेमॅटिक आवाजात म्हणतो कि, “ये झुंड नही है, टीम है टीम !” एक १०-१५ जणांचा घोळका ज्यांच्याकडे बघून सुपर ३० मधल्या पोरांची आठवण येते, ते मार्केटमधून स्लोमो मध्ये चालत आहेत, त्यांच्या हातात चेन, बॅट, दांडू असं अशा वस्तू आहेत, ज्यातून झुंड कुठेतरी राडा करायला निघालीय असे दिसते. मागे अजय अतुलचं वस्तीच्या भाषेतले बोल आणि बिट्स ऐकू येतात. म्युझिक मास साठीचं आहे, अजय अतुल आणि नागराजने सैराट नंतर पुन्हा एकदा फुल्ल व्यावसायिक पद्धतीने गोष्ट सांगायचे ठरवलेले दिसतेय.
फक्त महाराष्ट्रातल्या मातीतला म्हणून नव्हे, तर वेगळं काहीतरी आजूबाजूच्या माणसांच्या गोष्टी सांगणारा दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे यांच्या चित्रपटाविषयी अख्ख्या महाराष्ट्राला आणि खुद्द सुपरस्टार अमिताभ बच्चन मुख्य आणि वेगळ्या भूमिकेत दिसणार असल्याने अख्खा भारत या चित्रपटाची वाट पाहतोय. आणखी एक कारण हे ही आहे कि अमिताभ हा नागराजचा लहानपणापासूनच सर्वात आवडता नट आहे.
हा चित्रपट बच्चन यांच्या करिअर मधीलआणखी एक मैलाचा दगड ठरेल का ?
नागराज त्यांची जादू हिंदीतहीकायम ठेवू शकतील का?
नागराज सलग पाचव्या चित्रपटातहीराष्ट्रीय अवॉर्ड घेणार का?
अजय अतुल आणि नागराजसैराटची जादू पुन्हा करू शकतील का ?
या आधी शूटिंगचे आणि वादांची बरीच चर्चा आणि फोटोज बाहेर आल्यानंतर, अमिताभ बच्चन स्टारर ‘झुंड’ च्या निर्मात्यांनी आता अधिकृत टीजरचे अनावरण केले आहे आणि आपणा सर्वांनाच कुतुहलात पाडले आहे. आपल्या ट्विटर हँडलवरून नागराज मंजुळे आणि अमिताभ बच्चन यांनी आपल्या चाहत्यांसाठी चित्रपटाचे टीजर शेअर केले. टीजर मध्ये अमिताभ यांचा आवाज आहे.
‘झुंड’ हा चित्रपट स्लम सॉकरचा संस्थापक विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटात बच्चन एक प्राध्यापकाची भूमिका साकारत आहेत जे रस्त्यावरच्या मुलांना प्रवृत्त करते आणि फुटबॉल संघ सुरू करतात. मराठी चित्रपट निर्माते नागराज मंजुळे यांनी ‘सैराट’ या त्यांच्या मेगाहिट चित्रपटाने भारतभर प्रसिद्धी मिळवली. आगामी
बॉलिवूड चित्रपटासाठी अमिताभ पहिल्यांदा नागराजसमवेत काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटाद्वारे मंजुळे यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे.