Take a fresh look at your lifestyle.

तानाजी चित्रपटातील ‘या’ गोष्टींमध्ये बदल करा अन्यथा..जितेंद्र आव्हाडांची निर्मात्याला धमकी

0

मुंबई | बॉलिवूडचा अभिनेता अजय देवगण याने आता तानाजी मालुसरे यांच्या जीवानावर ‘तानाजी’ हा चित्रपट साकारला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तानाजी चित्रपटावर आक्षेप घेतला आहे.

राऊत यांनी तानाजी चित्रपटाचे निर्माते ओम राऊत यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. ओम राऊत तुमच्या तानाजी चित्रपटचा ट्रेलर पाहिला. त्यामध्ये काही प्रसंगांत तुम्ही ज्या अनैतिहासिक आणि चुकीच्या गोष्टी घुसडल्या आहेत त्यामध्ये लवकरात लवकर बदल करा अन्यथा यामध्ये मला माझ्या पद्धतीने लक्ष घालावे लागेल असं अाव्हाड यांनी म्हटले आहे.

दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी माझ्या या ट्विटला धमकी समजली तरी चालेल असं म्हणत निर्माते ओम राऊत यांना अप्रत्यक्षपणे धमकीच दिली आहे. आता यावर ओम राऊत काय प्रतिक्रिया देतात हे पाहुणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: