Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘हाऊसफुल्लचे बोर्ड लागतील..’; जितेंद्र जोशीकडून ‘वेड’ चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 29, 2022
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
VED
0
SHARES
1.7k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलीया देशमुख यांचा मराठी चित्रपट ‘वेड’ हा उद्या ३० डिसेंबर २०२२ रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या रिलीज होण्याआधीच त्याने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरपासून ते गाण्यांपर्यंत प्रत्येकाला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटाचा नुकताच प्रीमिअर पार पडला आणि यावेळी अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. या प्रिमिअरला उपस्थित राहिलेल्या जितेंद्र जोशीने चित्रपटाचे कौतुक करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामध्ये त्याने रितेश आणि जिनिलीयासोबतच फोटो शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

जितेंद्र जोशीने या पोस्टमध्ये लिहिले आहे कि, ‘आज वेड चित्रपट पाहिला आणि वेड लागलं!! रितेश भाऊंचं दिग्दर्शनात पदार्पण होतंय परंतु आपला ५० वा चित्रपट करावा या सफाईने आणि बारकाव्याने त्यांनी दिग्दर्शन केलंय आणि अभिनय सर्वोत्तम केलाय. जेनीलिया देशमुख यांच्याकडून त्यांच्या कारकिर्दीतलं सर्वोत्तम काम काढून घेण्यात ते यशस्वी ठरले आहेत. शुभंकर तावडेच्या प्रामाणिक कामाला तोड नाही. रवी राजने त्याच्या पहिल्याच सिनेमात साकारलेला खलनायक अप्रतिम. जिया शंकर सुद्धा उत्तम परंतु या चित्रपटात असलेल्या खुशी नावाच्या अगदी नावाप्रमाणेच असलेल्या चिमुरडीने मला खरोखर वेड लावलं. बाकी अशोक मामांविषयी मी काय बोलू? ते करू शकत नाहीत असा कुठलाही रोल नाही. या वयात, इतके सिनेमे केल्यानंतर देखील मला थक्क करून सोडलं त्यांनी!!’

View this post on Instagram

A post shared by jitendra joshi (@jitendrajoshi27)

पुढे लिहिलंय कि, ‘आमच्या प्राजक्त देशमुख या वेड्या लेखकाचे संवाद जेनेलिया देशमुख यांच्या डोळ्यांइतके, रितेश भाऊंच्या प्रामाणिकपणाइतके आणि अशोक मामांच्या अभिनयाच्या प्रेमाइतकेच बोलके आहेत. अजय अतुल हे मराठी मनाला पडलेलं अभूतपूर्व स्वप्न आहे. जे त्यांच्याच सुरांमार्फत आपण बघत राहतो आणि त्याला रितेश भाऊंनी बोलकं केलं आहे. सौरभ भालेरावचं पार्श्वसंगीत सिनेमाचा आत्मा आहे. रोहन मापुस्कर या ही कास्टिंगसाठी तुझे आभार. वेड चित्रपटाने मराठी सिनेमाला पुन्हा एकदा झळाळी प्राप्त होऊन हाऊसफुल्लचे बोर्ड लागतील अशी आशा आहे. मराठी सिनेमा सर्वार्थाने मोठा करण्याची किमया फक्त प्रेक्षकांच्या हाती आहे आणि यंदा ही ते होईल अशी अपेक्षा. भाऊ तुम्ही कडक फिल्म बनवली. आता थांबू नका!! लव्ह यु.’

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

वेड या मराठी चित्रपटाच्या माध्यामातून २० वर्ष अभिनयाची कारकीर्द असलेल्या रितेश देशमुखने पहिल्यांदाच दिग्दर्शनाची सूत्र हाती घेतली आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने त्याची पत्नी आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख मधील उत्तम अभिनयाचे पैलू सर्वांसमोर आणले आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून जिनिलियाने मराठी सिनेसृष्टीत दमदार पदार्पण केले आहे. या पूर्वी तिने हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम अशा तब्बल ५ भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. यामध्ये आता मराठी भाषेचादेखील समावेश झाला आहे. तसेच या चित्रपटात अभिनेता सलमान खान देखील एका गाण्यासाठी पाहूणा कलाकार म्हणून भेटीस आला आहे. एकंदरच चित्रपटाच्या रिलीजआधी एव्हढी हवा आहे, तर उद्याची स्थिती काय असेल याचा अंदाज लावणे काही मुश्किल नाही.

Tags: Genelia D'souza DeshmukhInstagram PostJitendra JoshiRiteish deshmukhVed
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group