Take a fresh look at your lifestyle.

मराठी सिनेसृष्टीला जितूचा अभिमान; NIFF मध्ये पटकावला उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतून अत्यंत अभिमानाची बाब समोर येतेय. हि बातमी ऐकून तुम्हाला आनंद होणार नाही असे होऊच शकत नाही. अत्यंत प्रतिष्ठित अशा न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल २०२२ (NYIFF) मध्ये जिओ स्टुडिओजच्या ‘गोदावरी’ या मराठी चित्रपटाची निवड झाली होती हे आपण सारेच जाणतो. यानंतर आता गोदावरी चित्रपटासाठी अभिनेता जितेंद्र जोशी याला ‘उत्कृष्ट अभिनेता’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामुळे मराठी मनोरंजन विश्वात नुसता आनंदी आनंद आहे. हि बातमी अतिशय अभिमानाची असून सर्व स्तरातून जितेंद्रवर कौतुकाचा वर्षाव होतोय.

विशेष म्हणजे या चित्रपट महोत्सवात ओपनिंग फिल्म म्हणून ‘गोदावरी’ चित्रपटाची निवड करण्यात आली होती. तेव्हाही मराठी सिनेसृष्टीला आनंद झाला होता. मात्र उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावून जितूने मानाचा तुरा रोवला आहे. ब्ल्यू ड्रॉप फिल्म्स आणि जितेंद्र जोशी पिक्चर्स निर्मित ‘गोदावरी’ या चित्रपटात अभिनेता जितेंद्र जोशी, विक्रम गोखले, नीना कुळकर्णी, संजय मोने आणि प्रियदर्शन जाधव या प्रतिभाशाली कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल महाजन यांनी केले असून आतापर्यंत या चित्रपटाने अनेक पुरस्कार पटकावले आहेत.

या चित्रपटात अभिनेता जितेंद्र जोशीच्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री गौरी नलावडे हिने सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर करून ही जितूला मिळालेल्या पुरस्काराबाबतची आनंदाची बातमी दिली आहे. ”क्षण अभिमानाचा! New York Indian Film Festival 2022 मध्ये गोदावरीसाठी जितेंद्र जोशीला ‘उत्कृष्ट अभिनेता’ पुरस्कार !” असे कॅप्शन तिने या पोस्टला दिले आहे. IFFI मध्ये मानाचा Silver Peacock पुरस्कार पटकावल्यानंतर अभिनयाच्या या दुसऱ्या पुरस्कारासाठी जितेंद्र जोशीचे हार्दिक अभिनंदन! असेही तिने यामध्ये लिहिले आहे.