Take a fresh look at your lifestyle.

निक-प्रियांकाच्या घरी ‘नन्ही परी चे आगमन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनस कायमच चर्चेत असतात. सोशल मीडियावर अक्टिव्ह  असणारी ही जोडी अनेक वेळा एकमेकांसोबतचे फोटो किंवा एकमेकांप्रतीचं प्रेम व्यक्त करत असल्यामुळे चर्चेत येत असतात. परंतु, या वेळी या दोघांची एका वेगळ्या कारणासाठी चर्चा होत आहे. निक आणि प्रियांकाच्या घरी एका ‘नन्ही परी’च आगमन झालं आहे.

जोनस ब्रदर्समधील जो जोनास पिता झाला आहे तर अभिनेत्री सोफी टर्नर आई झाली आहे. सोफी टर्नरने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून सध्या या बाळाची सगळीकडे चर्चा सुरु आहे. त्यातच सोफीने बाळाला  जन्म दिल्यामुळे प्रियांका आणि निक काका-काकू झाले आहेत. त्यामुळे सहाजिकचं त्यांची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. फिल्मफेअरने ट्विट करत ही माहिती दिली आहे.

सोफीने २२ जुलै रोजी एका मुलीला जन्म दिला असून Willa असं या बाळाचं नाव ठेवण्यात आलं आहे. सोफी तिच्या प्रेग्नंसी काळात चांगलीच चर्चेत होती. अनेक वेळा तिने इन्स्टावर तिच्या बेबीबंपसोबतचे फोटो शेअर केले होते.

Comments are closed.