Take a fresh look at your lifestyle.

जॉन अब्राहम आणि इमरान हाश्मी यांचा ‘मुंबई सागा’ झाला ओटीटीवर प्रदर्शित

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एक्शन ड्रामा चित्रपट ‘मुंबई सागा’ नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. २७ एप्रिलपासून हा चित्रपट अमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रेक्षकांसाठी प्रदर्शित करण्यात आला आहे. संजय गुप्ता दिग्दर्शित या चित्रपटात जॉन अब्राहम आणि इमरान हाश्मी यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर महेश मांजरेकर, काजल अग्रवाल, सुनील शेट्टी, प्रतीक बब्बर, रोहित रॉय, अमोल गुप्ते, समीर सोनी, गुलशन ग्रोवर आणि अंजना सुखानी यांच्यासारखे दिग्गज कलाकार या चित्रपटात दिसत आहेत. ‘मुंबई सागा’ची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, अनुराधा गुप्ता आणि संगीता अहीर यांनी टी-सीरीज़ आणि व्हाइट फेदर फिल्म्स बॅनर अंतर्गत केली आहे.

हा एक्शन ड्रामा अमर्त्य राव आणि सीनियर इंस्पेक्टर विजय सावरकर यांच्यामधील द्वंद्वाची एक काल्पनिक कहाणी आहे. हि कहाणी ९०च्या दशकातील मुंबईच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आली आहे. या चित्रपटात आशा-आकांक्षा, मित्रता आणि विश्वासघात अशा अनेक पैलूंना स्पर्श करणारे कथानक पाहायला मिळत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मुंबई सागा तेव्हा असणाऱ्या बॉम्बे आणि आज बनलेल्या मुंबईची कहाणी आहे. या चित्रीपात्रांतील अमर्त्य राव हि भूमिका जॉन अब्राहमी साकारतोय. तर इन्स्पेक्टर विजय सावरकर हि भूमिका इम्रान हाश्मीच्या पदरी पडली आहे. या दोन्ही भूमिका या चित्रपटातील मुख्य भूमिका असून हे संपूर्ण कथानक यांच्या अस्तित्वाने रंजक होताना दिसतेय.

‘मुंबई सागा’विषयी बोलताना जॉन अब्राहम म्हणाला की, “हा चित्रपट या मार्च महिन्यात थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला आहे आणि चाहत्यांनी नावाजला आहे. चित्रपट पाहिलेल्या चाहत्यांच्या प्रतिक्रियेमुळे मी आनंदी आहे. ‘मुंबई सागा’चा आता अमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रीमियर होतो आहे आणि त्यामुळे जगभरात आमची मेहनत वाखाणली जाईल, ही भावना अद्भुत आहे.

तो पुढे म्हणाला की, ‘जिंदा’ आणि ‘शूटआउट ऍट वडाला’मध्ये एकत्र काम केल्यानंतर संजयसोबत ‘मुंबई सागा’ माझा तीसरा प्रोजेक्ट आहे. मला त्यांच्याबरोबर काम करायला आवडते कारण मला असे वाटते की माझ्यातील उत्तम बाहेर काढण्यामध्ये ते नेहमीच यशस्वी ठरतात आणि याहून ही महत्त्वाचे म्हणजे त्यांना प्रेक्षकांची नस बरोबर माहिती असल्यामुळे त्यांनी केलेले चित्रपट दर्शकांनी पसंत केले आहेत. ‘मुंबई सागा’ एक एंटरटेनर आहे जी दर्शकांना पसंत पडेल. मी एक गैंगस्टर, अमर्त्य रावची व्यक्तिरेखा सकारात असून मी आधी साकारलेल्या भूमिकांहून ही खूप वेगळी आहे पहिल्यांदाच मी इमरानसोबत काम करत असून त्याचा मला खूप आनंद आहे. आम्ही चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान खूप चांगले क्षण एकत्र घालवले आहेत.