Take a fresh look at your lifestyle.

जॉन सीनाने शेअर केला ऐश्वर्या रायचा फोटो, चाहत्यांनी दिल्या प्रतिक्रिया

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | प्रसिद्ध डब्ल्यडब्ल्यूई रेसलर आणि हॉलिवूड अभिनेता जॉन सीनाचे भारतात असंख्य चाहते आहे. जॉन सीना अनेकदा भारतीय कलाकार, क्रिकेटपटूंचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. काही दिवसांपुर्वी त्याने अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यावर त्यांचे फोटो शेअर केला होता. आता जॉन सीनाने ऐश्वर्या रायचा देखील फोटो शेअर केला आहे. ऐश्वर्या देखील सध्या कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये आहे.

जॉन सीनाने ऐश्वर्याचा फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. त्याने नेहमी प्रमाणेच यावेळीही त्याने फोटो शेअर करतानना कोणतेही कॅप्शन मात्र लिहिले नाही.

सोशल मीडियावर त्याची ही पोस्ट व्हायरल होत आहेत. आतापर्यंत 5 लाखांपेक्षा अधिक युजर्सनी या पोस्टला लाईक केले आहे. भारतीय नेटकरी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत . एका युजरने तर लिहिले की, भाऊ तू भारतात ये, सरकारी नोकरी लावून देऊ.

Comments are closed.