Take a fresh look at your lifestyle.

RRR चित्रपटावरील प्रेम पाहून Jr.NTR आणि रामचरण झाले भावुक; रसिकांचे मानले आभार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच एस एस राजामौली यांचा RRR हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाने अगदी पहिल्यापासून दणका उडवला आहे. यानंतर आता बॉक्स ऑफिसवर RRR या चित्रपटाने मोठा कल्ला केला आहे. आतापर्यंत या चित्रपटाच्या कमाईने बाहुबली सारख्या सुपर डुपर हिट चित्रपटाचे रेकॉर्ड तोडले आहेत. या चित्रपटात अभिनेता ज्युनियर एनटीआर आणि रामचरण यांच्या महत्वाच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाला मिळालेले प्रेम पाहून हे दोन्ही सुपरस्टार अक्षरशः भावुक झाले आहेत.

RRR चित्रपटाला मिळालेले प्रेम पाहून सिनेमातील अभिनेता ज्युनियर एनटीआरने भावुक होत सिनेरसिकांचे आभार मानले आहेत. जुनिअर एनटीआर म्हणाला कि, “RRR च्या यशामध्ये तुम्हा रसिक मायबापांचा मोठा हात आहे. तुम्ही सिनेमावर प्रेम केलं नसतं तर आम्ही एवढं घवघवीत यश मिळवू शकलो नसतो. हा सिनेमा माझ्या आयुष्यातील खूप महत्वाचा सिनेमा आहे.

तर अभिनेता रामचरण याने म्हटले कि, चित्रपटाला दिलेले प्रेम पाहून आनंद होतोय आणि भूंकदेखिवलं व्हायला होतंय. या निर्व्याज प्रेमासाठी तुम्हा सगळ्यांचे आभार. तसेच अभिनेत्री आलिया भटचेही आभार. कारण आलिया तू उर्जेचं केंद्र आहेस. तुझ्यामुळे सिनेमाला चार चांद लागले आहेत”, असे म्हणत रामचरणने आलियाच्या अभिनयाचे देखील कौतुक केले आहे.

RRR चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर कमाल कल्ला करतोय. हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करतो आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने भारतात १९ कोटी कमावले. या सिनेमातील गाणी प्रेक्षकांना चांगलीच भावल्याचे दिसून येत आहे. यात शोले, नाचो नाचो, इत्थरा, राम राघव ही या सिनेमातील गाणी प्रेक्षकांच्या मनात घर करत आहेत.