Take a fresh look at your lifestyle.

अभिनेत्री जुही चावलाचे कानातले हिरे हरवले ; शोधून देणाऱ्यास मिळेल खास बक्षीस

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | अभिनेत्री जुही चावलाचं हिऱ्याचं कानातलं हरवलं आहे. ते शोधण्यासाठी आता तिने सोशल मीडियावरील यूझर्सकडे मदत मागितली आहे. रविवारी रात्री अभिनेत्रीने तिच्या एका ट्विटर पोस्टमध्ये तिच्या एका कानातलं पडल्याचं सांगितलं. यासोबतच तिने एक खास मेजेही शेअर केला आहे.

जुहीने ट्विटरद्वारे कानातले हरवल्याची माहिती शेअर केली. ‘ रविवारी सकाळी  मी मुंबई एअरपोर्टच्या गेट नंबर 8 मधून जात होते.  Emirates Counter  वर मी चेक-इन केले. सिक्युरिटी चेकिंग झाली, पण यादरम्यान माझे हिऱ्याचे कानातले कुठेतरी पडले. कोणी माझी मदत केली तर मला खरंच खूप आनंद होईल. कृपया ते शोधण्यामध्ये माझी मदत करा. कानालते सापडले तर कृपया पोलिसांना माहिती द्या. शोधणा-यास बक्षीस दिले जाईल. हे माझे मॅचिंग पीस आहे. 15 वर्षांपासून मी ती घालते आहे. प्लीज शोधण्यासाठी मदत करा,’ असे  जुहीने ट्विटमध्ये म्हटले आहे.

अभिनेत्रीने पुढे लिहिले की, ‘एखाद्याने मला ते कानातलं शोधून देण्यात मदत केली तर मला आवडेल. कृपया पोलिसांना कळवा आणि मी तुम्हाला बक्षीस देईन. हे एक मॅचिंग पीस आहे. मी गेल्या १५ वर्षांपासून जवळपास दररोज वापरत आहे. ते शोधण्यात मला मदत करा.. धन्यवाद.’

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.