हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच 5G तंत्रज्ञानाविरोधात बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलाने हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र हि धाव जुहीच्याच अंगाशी आली. देशात 5G मोबाइल नेटवर्क उभारण्यास एका याचिकेद्वारे जुही चावलासह अन्य दोन जणांना दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र कोर्टाने सुनावणी दरम्यान याचिकेतील त्रुटी दाखवून कोर्टाचा वेळ वाया घालवल्याबद्दल त्यांना २० लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. यानंतर अद्याप हि रक्कम न भरल्याबद्दल आता हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय ही रक्कम भरण्यासाठी हायकोर्टाने जुही चावला व त्या अन्य दोन जणांना पुढील एक आठवड्याच्या मुदतीची शेवट दिली आहे.
Delhi High Court asks Juhi Chawla to deposit Rs 20 Lakh within a week in connection with 5G lawsuit#DelhiHC #JuhiChawla #5Ghttps://t.co/7JLiTGKI1x
— Outlook Magazine (@Outlookindia) July 7, 2021
अभिनेत्री जुही चावलाकडून दाखल करण्यात आलेली याचिका फाजील स्वरूपाची आहे, असा आक्षेप घेत कोर्टाने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली होती. यानंतर देण्यात आलेल्या शिक्षेची अद्याप पूर्तता न झाल्याचे पाहून कोर्टाने स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे. याचिका कर्त्यांविषयी आम्ही अजूनही मवाळ भूमिका घेत आहोत. त्यांनी २० लाखांची रक्कम भरल्यानंतर त्यांच्या विरोधातील न्यायालयाची बेअदबी केल्याचा खटला मागे घेण्यात येईल,असे म्हणत कोर्टाने आपले मुद्दे बुधवारी स्पष्ट केले.
अभिनेत्री जुही चावला व अन्य संबंधितांनी देशातील न्याय प्रक्रियेचा गैरफायदा घेऊन केवळ आणि केवळ प्रसिद्धीसाठी अशा प्रकारची याचिका केली. तसेच 5G फोन नेटवर्कमुळे (तंत्रज्ञानामुळे) आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील, असा त्यांनी घेतलेला आक्षेप अगदीच निरर्थक आहे. ही केवळ खोडसाळ मनोवृत्तीतून करण्यात आलेली याचिका असल्याचे यात निरीक्षण केले असता समजून येते असे हायकोर्टाने त्यांच्या बाबतीत आधीच नोंदवले आहे. शिवाय 5G नेटवर्कमुळे पृथ्वीवरील मानवासहित सर्व प्राणिमात्रांना हानी पोहोचेल, असे जुही चावला व तिच्या सहकाऱ्यांचे म्हणणे होते. त्यामुळे तिने ही याचिका केली होती, असे तिने सांगितले. यासह आमचा 5G तंत्रज्ञानास विरोध नाही पण त्यामुळे हानी होणार नाही याचे पुरावे द्या असेही जुहीने स्पष्ट केले होते.