Take a fresh look at your lifestyle.

‘नवरा दिसायला कसा हवा?’ यावर जुई गडकरीने दिले साजेसे उत्तर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अनेक कलाकार हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करीत असतात. त्याचप्रमाणे इंन्ट्राग्रामवरील हॅशटॅग ‘AskMeAnything’ हा ट्रेंड प्रचंड फेमस आहे. याद्वारे कलाकार आपल्या चाहत्यांशी गप्पा मारतात. मग चाहतेही बिनधास्तपणे मनातले प्रश्न विचारतात आणि कलाकारही त्याची मनमोकळेपणाने उत्तर देतात. ‘पुन्हा कर्फ्यू… घरात बसून कंटाळला आला… तुम्ही मला विचारा आणि मी ते पोस्ट करेन’ असे म्हणत अभिनेत्री जुई गडकरींने आपल्या चाहत्यांना प्रश्न विचारण्याची संधी दिली. त्यानंतर एका चाहत्याने तिला ‘पार्टनर दिसायला कसा हवा?’ असा प्रश्न विचारला आहे. यावर जुईने मनामनाला भिडेल असं उत्तर दिल आणि प्रेक्षकांना ते भावलं.

Ask Me Anything Session

जुई गडकरी हि अभिनेत्री छोट्या पडद्यावरील लोकप्रिय चेहऱ्यांपैकी एक आहे. तिने विविध मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात आपली जागा मिळवेळी आहे. नुकतीच अभिनेत्री जुई गडकरीने आपल्या चाहत्यांबरोबर गप्पा मारल्या. तिने ‘पुन्हा कर्फ्यू. घरात बसून कंटाळला आला. तुम्ही मला विचारा आणि मी ते पोस्ट करेन’ म्हणत चाहत्यांना प्रश्न विचारण्याची संधी दिली. त्यानंतर एका चाहत्याने तिला ‘पार्टनर दिसायला कसा हवा?’ असा प्रश्न विचारला आहे. त्यावर चाहत्याला उत्तर देत जुई म्हणाली, ‘दिसणं महत्त्वाचं असतं का? हो.. पण जर एखाद्या व्यक्तीचे तुमच्यावर खरे प्रेम असेल तर त्याच्यासाठी तुम्ही कसे दिसता हे इतके महत्त्वाचे नसते.’

जुईने दिलेल्या या उत्तराने साऱ्यांची मने जिंकली आहेत. दुसऱ्या एका चाहत्याने जुईला जर तुझा लाइफ पार्टनर मिळाला पण त्याला मांजर आवडत नसेल तर तू त्याच्याशी लग्न करशील का? असा एक प्रश्न विचारला होता. त्यावर तिने ‘असा पार्टनर शोधणारच नाही ना भाऊ’ असे उत्तर दिले आहे. जुईचा हा दिलखुलास अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला असून तिचे हे लक्षवेधक उत्तर सध्या ट्रेंड होत आहे.