Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘ठरलं तर मग..’; स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेतून जुई गडकरीचं छोट्या पडद्यावर पुनरागमन

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 7, 2022
in TV Show, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Tharal Tar Mag
0
SHARES
1.6k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सखे गं टाक ‘पुढचं पाऊल..’ हि मालिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात असेल यात काहीच वाद नाही. कारण स्टार प्रवाह वरील अत्यंत गाजलेल्या आणि सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या या मालिकेचा प्रेक्षक वर्ग प्रचंड मोठा होता. या मालिकेतून घराघरात पोहोचलेली आदर्श सूनबाई ‘कल्याणी’ अर्थात जुई गडकरी आता पुन्हा एकदा मालिका विश्वातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. स्टार प्रवाह वरील ‘ठरलं तर मग’ या नव्या कोऱ्या मालिकेतून जुई गडकरी येत्या काळात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

‘ठरलं तर मग’ या मालिकेत जुई गडकरी सायली नामक एका मुलीचे पात्र साकारते आहे. या भूमिकेविषयी बोलताना जुई म्हणाली कि, ‘ही मालिका करताना मला अतिशय आनंद होत आहे. माहेरी आल्याची भावना आहे. पुढचं पाऊल मालिकेतल्या कल्याणीवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. त्यामुळे या नव्या पात्रावरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतील याची मला खात्री आहे. सायली अतिशय समजूतदार आणि स्वतंत्र विचारांची मुलगी आहे. अनाथ असली तरी नात्यांचं महत्व जाणणारी आणि अन्याय सहन न करणारी मात्र प्रचंड वेंधळी अशी हि मुलगी आहे. सायलीच्या वेंधळेपणामुळेच मालिकेत मजेशीर प्रसंगही पहायला मिळतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मालिकेची कथा हे मालिकेचं बलस्थान आहे. त्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजते की इतक्या छान प्रोजक्टचा मला भाग होता आलं.’

View this post on Instagram

A post shared by Jui Gadkari (@juigadkariofficial)

माहितीनुसार, ‘ठरलं तर मग’ या मालिकेचे ‘एकमेकांना घासातला घास द्यायचा…’ हे ब्रीदवाक्य आहे. या मालिकेची निर्मिती आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शन्सने केली आहे. तर मालिकेचे दिग्दर्शन सचिन गोखले हे करणार आहेत. नुकताच या मालिकेचा पहिला वहिला प्रोमो सोशल मिडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्याला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली आहे. यामध्ये सायली अर्थात जुई गडकरी एका अनाथ आश्रमात तेथील मुलांची देखभाल करताना दिसते आहे. त्यांच्या भुकेसाठी ती स्वतः उपाशी राहते, पण तिथे असणारे आजोबा मात्र तिला मायेने जेवू घालतात. असा काहीसा भावनिक प्रसंग यात दाखवला आहे.

Tags: instagramJui GadkariPromo Videostar pravahUpcoming Marathi SerialViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group