Take a fresh look at your lifestyle.

मुलगा झाला मुलगा! अभिनेत्री काजल अग्रवाल आई झाली; पती गौतमने बाळाचे नावही केले जाहीर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सिंघम फेम बॉलिवूड अभिनेत्री काजल अग्रवालने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. यामुळे काजल अग्रवाल आणि गौतम किचलू यांच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन झाले असून घरात नुसता आनंदी आनंद आहे. बॉलिवूड बबलने याचे वृत्त दिल्यानंतर सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस पडत होता. मात्र अधिकृतरीत्या कुणीही हि आनंदाची बातमी शेअर केली नव्हती. मात्र आता चिमुकल्या बाळाच्या आगमनाची बातमी खुद्द बाळाच्या बाबांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. इतकेच नव्हे तर बाळाचे नावसुद्धा सांगितले आहे.

अभिनेत्री काजल अग्रवालने १९ एप्रिल रोजी आपल्या बाळाला जन्म दिला आहे. सध्या काजल आणि बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. काजल आणि गौतमचे हे पहिलेच बाळ आहे. त्यामुळे ते दोघेही आई बाबा झाल्याचा आनंद आपल्या नातेवाईक आणि मित्रमंडळी तसेच चाहत्यांसह शेअर करण्यास उत्सुक आहेत. या वृत्तास दुजोरा देणारी पोस्ट लिहीत काजलचा पती आणि प्रसिद्ध उद्योजक गौतम किचलू याने इंस्टारांवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने लिहिले आहे कि, आमचे अंतःकरण आनंदाने भरले आहे आणि आम्ही फार कृतज्ञ आहोत. तुमच्या प्रेम आणि आशीर्वादांबद्दल खर्च सर्वांचे आभार! या कॅप्शनसह शेअर केलेल्या फोटोमध्ये बाळाचे नाव ‘नील’ असे आहे हे सांगण्यात आले आहे.

या पोस्टवर सध्या जगभरातून काजलचे चाहते आणि नेटकरी मोठ्या संख्येने शुभेच्छा देताना दिसत आहेत. ‘सिंघम’ चित्रपटातून काजलने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये स्वतःची एक वेगळी जागा निर्माण केली. यामुळे लाखों दिलों कि धडकन म्हणून अभिनेत्री काजल अग्रवालला ओळखले जाते. तिने ३० ऑक्टोबर २०२० मध्ये उद्योगपती गौतम किचलू याच्याशी लग्न केले. मोठ्या थाटामाटात त्यांचा विवाहसोहळा पार पडला.

या लग्न सोहळ्याला काही कलाकरांनीदेखील हजेरी लावली होती. काजल आणि गौतम ७ वर्षे एकमेकांना डेट करत होते आणि त्यानंतर त्यांनी लग्न केले. आता लग्नानंतर २ वर्षांनी ते आता आई- बाबा झाले आहेत. किचलू परिवारात एका गोड मुलाची एंट्री झाली आहे. त्यामुळे नेहमी पतीसोबत फोटो शेअर करणारी काजल आता लेकासोबत फोटो शेअर करताना दिसेल याबाबत तिचे चाहते उत्सुक आहेत.