हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री काजोल हि सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. गेल्या अनेक दशकापासून ती बॉलिवूड सिनेसृष्टीत विविध सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसत आहे. काजोलचा चाहता वर्ग मोठा आहे. जो तिच्याबाबत जाणून घ्यायला नेहमीच उत्सुक असतो. काही तासांपूर्वी काजोलने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत सोशल मीडियाला राम राम ठोकल्याचे म्हटले होते. हि पोस्ट पाहून तिचे चाहते तिच्याबाबत चिंता व्यक्त करू लागले. मात्र तिने नुकतीच शेअर केलेली पोस्ट पाहून समजतंय कि हा तर सगळा ड्रामा होता. जे पाहून चाहते भडकले आहेत.
अभिनेत्री काजोलने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्राम आणि ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करताना काजोलने लिहिले की, ‘मी माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण परीक्षेचा सामना करत आहे’. याचसोबत तिने पोस्टच्या कॅप्शनमध्ये ‘सोशल मीडियापासून ब्रेक घेत आहे’ असे लिहिले आहे. यांनतर तिच्या सर्व पोस्ट इंस्टाग्राम फीडमधून गायब झाल्या होत्या. हे सर्व पाहून काजोलला काय झालंय..? ती कोणत्या अडचणीत आहे का..? ती भावनांच्या संघर्षात अडकली आहे का..? असे विविध विचार चाहते करू लागले.
पण या पोस्टनंतर काही तासांतच तिने हा प्रमोशनल स्टंट असल्याचे सांगत आपल्या आगामी प्रोजेक्टची माहिती दिली. ‘द ट्रायल’ नावाच्या वेब सीरिजमध्ये ती दिसणार आहे आणि याचा पहिला लूक तिने शेअर केलाय.
यानंतर तिच्या इंस्टाग्राम पोस्ट पुन्हा प्रोफाइलवर दिसू लागल्या. कारण या तिने केवळ प्रसिद्धीसाठी लपवल्या होत्या. हा स्टंट पाहताच नेटकरी भडकले आणि म्हणाले कि, ‘अतिशय घृणास्पद आहे हे. किमान असं नाटक करण्यापूर्वी तुमच्या फॅन्सचा विचार करायला हवा होता’. तर आणखी एकाने म्हटले, ‘सर्वात वाईट! पूर्णपणे लज्जास्पद.. पुढच्या वेळी विश्वास ठेवूच शकत नाही’.
Discussion about this post