हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| ‘कच्चा बदाम‘ गाण्यानंतर आता ‘काला अंगूर’ या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. नुकतेच एक काका ‘कच्चा अमरूद’ हे गाणे गाताना सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता त्याच काकांनी ‘काला अंगूर’ आणले आहे. काका रस्त्यावर फिरतात आणि गाणी गाताना फळे विकतात. नुकतेच जेव्हा त्यांचे ‘कच्चा अमरूद’ हे गाणे व्हायरल झाले तेव्हा एक वेगळाच उत्साह दिसून आला होता.
https://www.instagram.com/reel/CaZQQMnjL_U/?utm_medium=copy_link
ज्या पद्धतीने ‘कच्चा बदाम’ आणि ‘कच्चा अमरूद’ या गाण्यांनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला, आता ‘काला अंगूर’देखील त्याच मार्गावर आहे. त्यामुळे सोशल मीडिया यूझर्सना त्याचे वेड लागले आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की हातगाडीवर बसलेले ‘चाचा’ चहाचे घोट घेत ‘काला अंगूर’ गाताना दिसत आहेत.
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ शेअर करण्यासोबतच यूझरने कॅप्शनमध्ये लिहिले, की पश्चिम बंगालमधील भुबन बद्याकर या शेंगदाणा विक्रेत्याने ‘कच्चा बदाम’ गाणे गाऊन इंटरनेटवर अधिराज्य गाजवले होते. ‘कच्चा बदाम’ या गाण्यावर लाखो-करोडो रिल्स तयार झाल्या आहेत.