Take a fresh look at your lifestyle.

केस काळे केले म्हणून कोणी तरुण होत नाही, तू आता निवृत्ती घे ; ‘या’ अभिनेत्याचा धोनीला सल्ला

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन| आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्जची कामगिरी खूपच खराब झाली आहे. दुबईच्या मैदानावर झालेल्या सामन्यात सनराईजर्स हैदराबादने चेन्नई सुपरकिंग्जवर ७ धावांनी मात केली.या सामन्यावर अभिनेता कमाल आर. खान याने प्रतिक्रिया दिली. चेन्नई सुपरकिंग्जच्या पराभवासाठी त्याने धोनीला जबाबदार धरलं आहे. “केस काळे करुन कोणी तरुण होत नाही, जमत नसेल तर निवृत्ती घे” असा उपरोधिक टोला त्याने धोनीला लगावला आहे.

१६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना धोनीने अखेरपर्यंत लढत दिली. अखेरच्या षटकांमध्ये केलेल्या फटकेबाजीमुळे सामन्यात रंगत निर्माण झाली. परंतू त्याचे प्रयत्न कमीच पडले. फलंदाजीदरम्यान उष्ण वातावरणामुळे आलेला थकवा आणि धापा टाकणारा धोनी हे चित्र सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं. या चित्राच्या पार्श्वभूमीवर कमाल आर खान उर्फ केआरकेने धोनीवर टीका केली आहे.

मित्रा, केस काळे करुन कोणी तरुण होत नाही. २ धावा काढतानाही तुला धाप लागत होती. वय वाढल्यानंतर असा त्रास सर्वांनाच होतो. पण म्हातारपणी असा अपमान करुन घेणं तुला चांगलं वाटतंय का? आम्ही तुझे फॅन आहोत, तुझी अशी अवस्था पाहून आम्हाला खुप दु:ख होतंय. त्यामुळे कृपया आता तू निवृत्ती स्विकार.” अशा आशयाचं ट्विट करुन केआरकेने धोनीला उपरोधिक टोला लगावला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’