सोशल कट्टा । १० जानेवारी रोजी दीपिका पादुकोणचा ‘छपाक’ चित्रपट रिलीज होत आहे. या सिनेमात ती अॅसिड अटॅक बळीची भूमिका साकारत आहे. छपाक या चित्रपटामध्ये दीपिका व्यतिरिक्त विक्रांत मस्से मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. दीपिकाचा अॅसिड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवालच्या आयुष्यापासून प्रेरित आहे. या चित्रपटात दीपिका मालतीच्या भूमिकेत आहे. रिलीज होण्यापूर्वी मध्य प्रदेश आणि छत्तीसगड सरकारने छपक हा चित्रपट करमुक्त केला आहे.
१० जानेवारीला छपाकसोबत ‘तान्हाजी’ हा चित्रपट देखील प्रदर्षितहोणार आहे. सध्या दीपिकाच्या आयुष्यात राजकीय गोंधळ सुरु आहे. #बॉयकॉटछपाक सुरु असताना दीपिकाला हि एक आनंदाची बातमी मिळाली आहे. छपाक करारमुक्त झाल्याचे खुद्द मुख्यामंत्री कमलनाथ यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सांगितले. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंट वर लिहिले की , दीपिका पादुकोण या अभिनेत्रीने अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीच्या जीवनावर आधारित असलेल्या चित्रपट जो देशभरात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे तो मध्यप्रदेशमध्ये कारकमुक्त करत आहोत. या चित्रपटात समाजात अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या महिलांसाठी एक सकारात्मक संदेश देण्याबरोबरच आत्मविश्वास , संघर्ष , नवीन आशा निर्माण करणारा आहे.
दीपिका पादुकोण अभिनीत ऐसिड अटैक सर्वाइवर पर बनी फ़िल्म “
छपाक “ जो 10 जनवरी को देश भर के सिनेमाघरों में रिलीज़ हो रही है , को मध्यप्रदेश में टैक्स फ़्री करने की घोषणा करता हूँ।
1/2— Kamal Nath (@OfficeOfKNath) January 9, 2020
यह फ़िल्म समाज में ऐसिड पीड़ित महिलाओं को लेकर एक सकारात्मक संदेश देने के साथ-साथ उस पीड़ा के साथ आत्मविश्वास , संघर्ष , उम्मीद , और जीने के जज़्बे की कहानी पर आधारित है और ऐसे मामलों में समाज की सोच में बदलाव लाने के संदेश पर आधारित है।
2/2— Kamal Nath (@OfficeOfKNath) January 9, 2020