Take a fresh look at your lifestyle.

लढाऊ पायलट बनण्यासाठी कंगना रानौत सज्ज ; डिसेंबरपासून सुरू होणार ‘तेजस’चे शूटिंग

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । अभिनेत्री कंगना रानौतच्या च्या आगामी ‘तेजस’ चित्रपटाचे शूटिंग कधीपासून सुरू होईल, याची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचे शूटिंग या वर्षाच्या डिसेंबर महिन्यापासून सुरू होईल. कंगना रानौत स्टारर फिल्म ‘तेजस’ हि एक निर्भय फाइटर पायलटची कथा आहे. भारतीय हवाई दल ही २०१६ मध्ये महिलांना लढाऊ भूमिकेत गुंतविणारी देशातील पहिली संरक्षण सेना होती. आणि हा चित्रपट या ऐतिहासिक घटनेने प्रेरित आहे.

आरएसव्हीपीने आपल्या सोशल मीडिया अकाउंट ट्विटरवर चित्रपटाचे शूटिंग अधिकृतपणे जाहीर केले आहे, तसेच पायलटच्या ड्रेसमध्ये कंगना फाइटरचे एक पोस्टरही शेअर केले आहे. कंगनाने तिच्या ट्विटर अकाऊंटवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करुन या चित्रपटाविषयी माहितीही दिली आहे. सर्वेश मेवाडा दिग्दर्शित ‘तेजस’. या चित्रपटाची निर्माता रॉनी स्क्रूवाला असेल. सैनिकावर आधारित बनलेला रॉनीचा हा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी त्याने विकी कौशलचा ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’ हा चित्रपट तयार केला होता.

या चित्रपटाविषयी बोलताना कंगना म्हणाली, तेजस ही एक कथा आहे ज्यात मला एअरफोर्सच्या पायलटची भूमिका साकारण्याचा बहुमान मिळाला आहे. या वर्गामधील प्रत्येक धाडसी पुरुष आणि स्त्रियांना अभिवादन केले जाणाऱ्या  अशा चित्रपटाचा भाग होण्याचा मला अभिमान वाटतो, जे या कर्तव्याच्या पंक्तीत दररोज प्रचंड त्याग करतात. सर्वेश आणि रॉनीसमवेत या सफर मध्ये सामील होण्यासाठी उत्साहित आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’