Take a fresh look at your lifestyle.

तुम्हीही एक महिला आहात; कंगनाच्या इंस्टापोस्टमध्ये सोनिया गांधींचा उल्लेख

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नेहमीच विविध वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारी बॉलिवूडची पंगा गर्ल अर्थात अभिनेत्री कंगना रनौत हिला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या धमकीनंतर तिने थेट पंजाब पोलिसांत FIR दाखल केली आहे. याबाबत तिने स्वतःच सोशल मीडिया इंस्टाग्रामवर याची माहिती देताना एक भली मोठी पोस्ट लिहिली आहे. पंजाब येथील अमृतसरमधील सुवर्ण मंदिरातील स्वत:चे काही फोटो शेअर करत कंगनाने हि पोस्ट लिहिली आहे. याच पोस्टमध्ये तिने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचाही उल्लेख करीत विनंती केली आहे. तुम्हीही एक महिला आहात. तुमच्या सासूबाई आणि देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी अखेरच्या क्षणापर्यंत दहशतवाद्यांविरोधात लढल्या. कृपया, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना कारवाई करण्याचे निर्देश द्या, असे कंगनाने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

कंगनाने या पोस्टमध्ये लिहिले आहे कि, मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील शहीदांचे स्मरण करून मी लिहिले की, देशद्रोह्यांना कधीही माफ करू नका किंवा विसरु नका. या प्रकारात देशाच्या अंतर्गत गद्दारांचा हात आहे. कधी पैशाच्या लालसेने तर कधी पदाच्या लालसेपोटी भारतमातेला कलंकित करण्याची एकही संधी देशद्रोह्यांनी सोडली नाही. जयचंद देशद्रोही षड्यंत्र रचून देशद्रोही शक्तींना मदत करत राहिले, तेव्हाच अशा घटना घडत आहेत. माझ्या या पोस्टवर मला विघटनकारी शक्तींकडून सतत धमक्या येत आहेत. भटिंडाच्या एका भाईसाहेबांनी मला जीवे मारण्याची उघड धमकी दिली आहे.

मी या प्रकाराला वा धमक्यांना घाबरत नाही. देश आणि दहशतवादी शक्तींविरुद्ध कट करणाऱ्यांविरोधात मी बोलते आणि नेहमीच बोलत राहीन. निष्पाप जवानांची हत्या करणारे नक्षलवादी असोत, टुकडे टुकडे टोळ्या असोत किंवा ऐंशीच्या दशकात पंजाबमधील गुरुंच्या पवित्र भूमीचे तुकडे करून खलिस्तान बनवण्याचे स्वप्न पाहणारे परदेशात बसलेले दहशतवादी असोत. लोकशाही ही आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद आहे, सरकार कोणत्याही पक्षाचे असो, पण अखंडता, एकात्मता आणि नागरिकांचे मूलभूत हक्क आणि विचार अभिव्यक्तीचे रक्षण करण्याचा मूलभूत अधिकार बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेने आपल्याला दिला आहे. मी कधीही कोणत्याही जात, धर्म किंवा गटाबद्दल अपमानास्पद किंवा द्वेषपूर्ण काहीही बोललो नाही.

मी काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनियाजी यांना आठवण करून देऊ इच्छिते की, तुम्ही देखील एक महिला आहात. तुमच्या सासूबाई इंदिरा गांधीजी यांनी शेवटच्या क्षणापर्यंत या दहशतवादाविरुद्ध जोरदार लढा दिला. कृपया तुमच्या पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना अशा दहशतवादी, विघटनकारी आणि देशविरोधी शक्तींकडून येणाऱ्या धमक्यांवर त्वरित कारवाई करण्याची सूचना द्या. या धमक्यांविरोधात मी पोलिसात एफआयआर नोंदवला आहे. मला आशा आहे की पंजाब सरकारही लवकरच कारवाई करेल. माझ्यासाठी देश सर्वोपरि आहे, यासाठी मला बलिदान द्यावे लागले तरी मला मान्य आहे, पण मी घाबरत नाही आणि कधीही घाबरणार नाही, देशाच्या हितासाठी देशद्रोह्यांच्या विरोधात उघडपणे बोलत राहीन.त्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी निवडणूक जिंकण्याच्या राजकीय महत्वाकांक्षेसाठी कोणाचाही द्वेष पसरवू नये.जय हिंद, जय भारत