Take a fresh look at your lifestyle.

कंगनाने घेतला करण जोहरचा धारदार समाचार; गिधाड संबोधून केली टीका

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकतेच धर्मा प्रोडक्शनचा आगामी चित्रपट ‘दोस्ताना २’ मधून कार्तिक आर्यनला बाहेर काढल्याची अधीकृत माहिती मिळाली आहे. ज्यानंतर संपूर्ण सिनेसृष्टीत विविध चर्चांनी जोर धरला आहे. यामुळे अभिनेत्री कंगनाने करण जोहरवर निशाणा साधत एक टीका केली आहे. सुशांतप्रमाणे त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडू नका, गिधाडांनो सोडा त्याला एकटं.. निघून जा इथून तुम्ही.’ अशा शब्दांत तिने टीका केली आहे.

कंगनाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि, ‘कार्तिक इथवर त्याच्या बळावर पोहोचला आहे. स्वत:च्याच बळावर तो असाच पुढे जात राहील. पापा जो म्हणजे करण जोहर आणि त्यांच्या नेपोटीझम गँगला मी एकच विनंती करु इच्छिते की त्याला एकट सोडा. सुशांतप्रमाणे त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडू नका, गिधाडांनो सोडा त्याला एकटं.. निघून जा इथून तुम्ही.’

कार्तिक तू यांना घाबरू नकोस, असे म्हणत धर्मा प्रोडक्शन, करण जोहर आणि सिनेसृष्टीत होणाऱ्या घराणेशाहीवर कंगनाने या मंडळींना धारेवर धरले. सुशांतच्या बाबतीतही यांनी असेच करीत, तो अमली पदार्थांच्या आहारी असून त्याची वर्तवणूक योग्य नाही असे पसरविले होते. हि बाब देखील कंगनाने अधोरेखित केली. स्वत:वर विश्वास ठेव, यावेळी आम्ही तुझ्याच सोबत आहोत, असा विश्वास तिने कार्तिकला देऊ केला आहे.

कलाविश्वातील घराणेशाही, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण हे मुद्दे पुन्हा एकदा डोकावू पाहत आहेत. धर्मा प्रोडक्शनशी संबंधित एका व्यक्तीने एबीपी न्यूजला माहिती देत सांगितले की, करण जोहरने कार्तिक आर्यनला ‘दोस्ताना २’ मधून बाहेर काढले आहे. तसेच भविष्यात कार्तिक आर्यनसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.