Take a fresh look at your lifestyle.

‘हे सारं मन विषण्णं करणारं आहे’; कन्हैय्यालाल हत्या प्रकरणाचा कंगनाकडून तीव्र निषेध

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबरांवर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे आधीच वातावरण पेटलेल होत. या दरम्यान राजस्थानातील उदयपूर निवासी कन्हैय्यालालच्या लहान मुलाने सोशल मीडियावर नुपूर शर्मा यांचे समर्थन करणारी एक पोस्ट केली होती. यामुळे कन्हैय्यालाल यांनी जीवे मारण्याची धमकी दिली जात होती. यानंतर त्यांनी स्वतःचे दुकान बरेच दिवस बंद ठेवले होते. पण ज्या दिवशी त्यांनी दुकान उघडलं त्या दिवशी सगळं काही बदललं. काही घुसखोरांनी त्यांच्या दुकानात शिरकाव करून त्यांची निर्घृण हत्या केली. या घटनेनं संपूर्ण राजस्थान हादरलं. केवळ राजस्थान नव्हे तर याचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. याबाबत कंगनाने एक संतापजनक पोस्ट केली आहे.

राजस्थानातील या घटनेचे देशभर पडसाद उमटत असताना बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी या घटनेचा निषध केला आहे. ज्यामध्ये कंगनाचा देखील समावेश आहे. कंगनाने इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत लिहिलं आहे की, देवाच्या नावानं जे काही होतं आहे ते पाहिल्यास वाईट वाटते. त्या व्हिडिओने मला हादरवून टाकलं आहे. तो व्हिडिओ पाहवत नाही.

देशभरामध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. ज्या व्यक्तीची हत्या झाली त्याचे दुकान जबरदस्तीनं बंद करण्यात आले. त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली. हे सारं मन विषण्णं करणारं आहे. कंगनाने तिच्या स्टोरीमध्ये २ फोटो शेअर केले आहेत. यातील एकात मृत व्यक्तीचा फोटो आहे तर दुसऱ्या फोटोत त्याला जीवे मारणाऱ्यांचा. तिच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहे.

उदयपूरमध्ये घडलेल्या या घटनेने सगळ्यांना हादरवून टाकल आहे. हि घटना एक मोठा धक्का ठरली आहे. हे सगळं काही देवाच्या नावानं सुरु आहे. जे कोणी असे काम करत असेल त्यांना तातडीनं शिक्षा करण्यात यावी. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावरुन अनेकांनी दिल्या आहेत.

कंगनाने तर संबंधित घटनेचा तो व्हिडिओ पाहण्याचे आपल्यात धाडसच नाही, असेही म्हटले आहे. कंगनाशिवाय अभिनेत्री स्वरा भास्कर, विशाल ददलानी, रिचा चढ्ढा यांनीदेखील या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.