Take a fresh look at your lifestyle.

सहा बोटं असलेल्यांचा घसा सुकतोय..; कंगनाचा अप्रत्यक्षपणे हृतिक रोशनवर शाब्दिक वार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच आपल्या पंगा घेण्याच्या सवयीमुळे चर्चेत असते. त्यात कंगना v/s हृतिक हा वाद सर्वश्रुत आहे. याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा कंगनाने सक्रियरित्या अप्रत्यक्षपणे हृतिकवर वार केलाय. तिचा नवाकोरा कार्यक्रम ‘लॉक अप’ सध्या सुरु आहे. याच शोच्या माध्यमातून कंगनाने हृतिक रोशनला जबरदस्त टोमणा लगावला आहे. कंगनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल देखील होतोय. हा व्हिडीओ ‘लॉक अप’च्या प्रीमिअर एपिसोडमधला आहे.

कंगना हि ‘लॉक अप’ या शोची सूत्रसंचालक आहे. तर वीकेंडच्या एपिसोडमध्ये ती सेलिब्रिटी स्पर्धकांशी गप्पा मारताना दिसते. माझ्या या नव्या शोमुळे अनेकांच्या मनात धडकी भरली आहे, असं ती या व्हायरल व्हिडीओमध्ये म्हणताना दिसतेय. ‘जे लोक माझ्याशी पाच वर्षांपासून बोलत नव्हते, त्या लोकांचे मला आता फोन येऊ लागले आहेत, ते मला भेटवस्तू पाठवत आहेत. कंगनाचं मन राखून ठेऊयात, नाहीतर आत जाऊन ती आमची पोलखोल करेल, असा त्यांचा त्यामागचा विचार आहे. लोकं पाच बोटं जोडून हात जोडत आहेत. तसं तर सहा बोटं असलेल्या लोकांचाही घसा सुकतोय”, अशा शब्दांत तिने हृतिकला टोला लगावला आहे. कंगनाच्या या वक्तव्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देत हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल केला आहे.

त्याच झालं असं कि, हृतिक आणि कंगना काही वर्षांपूर्वी आधी चांगले मित्र होते. मात्र अचानक या दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर हृतिकने कंगनावर काही आरोप अगदी बेलगामपणे लावले. यात कंगनाने सतत ईमेल पाठवून त्रास दिल्याचा आरोप त्याने केला होता. दरम्यान २०१६ साली हृतिकने कंगनाला कायदेशीर नोटीसही बजावली होती. हे प्रकरण सायबर सेलकडून सीआययुकडे पाठविले आहे. याप्रकरणी गतवर्षी फेब्रुवारीमध्ये हृतिकने मुंबई क्राईम ब्रांचकडे आपला जबाब नोंदवला होता.