मुंबई : पत्रकार परिषदेत पत्रकारासोबत घातलेल्या वादावरून आता कंगना राणावत पुन्हा वादात अडकली आहे . एन्टरटेन्मेंट जर्नलिस्ट गिल्डने अभिनेत्री कंगना राणावतवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच तिने सार्वजनिकरीत्या माफी मागावी, अशी मागणी गिल्डने केली आहे.
‘जजमेंटल है क्या’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेत्री कंगना राणावतने एका पत्रकाराशी अपमानास्पद वर्तणूक केली होती. भर पत्रकार परिषदेत कंगनाने या पत्रकरासोबत वाद घातला होता. पत्रकाराने प्रश्न विचारण्यासाठी नाव सांगताच ती त्याच्यावर भडकली आणि आरोप करायला लागली. पत्रकाराने मणिकर्णिका सिनेमाच्या वेळी आपल्याबद्दल खोटंनाटं लिहिलं होतं, असं कंगनानं म्हटलं होतं. मात्र कंगनाने केलेले सर्व आरोप पत्रकाराने फेटाळले.
कंगनाच्या पाठोपाठ तिची बहीण रंगाली हीसुद्धा मीडियावर तुटून पडली. या प्रसंगानंतर ‘जजमेंटल है क्या’ या कंगनाच्या आगामी चित्रपटाला पूर्णपणे बॉयकॉट करण्याचा अर्थात या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मीडियाने घेतला. यामुळे कंगनाच्या चित्रपटाला आता कुठल्याही प्रकारचे मीडिया कव्हरेज दिले जाणार नाही, अशी माहिती समोर आली आहे. “गिल्डच्या सदस्यांनी एकता कपूर आणि कंगना राणावतने सार्वजनिकरीत्या माफी मागण्यास सांगितलं. यानंतर निर्माती एकता कपूरने माफीनामा जाहीर करून सहमती दर्शवली आणि रविवारी घडलेल्या घटनेवर दुःख व्यक्त केले.
Discussion about this post