Take a fresh look at your lifestyle.

सुशांत आत्महत्या प्रकरणी कंगणाने फेटाळला एम्सचा अहवाल ; म्हणाली की….

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | दिवंगत अभिनेता सुशांत सिंग रजपूत याची हत्या केली नसून त्यानेच आत्महत्या केली आहे असा अहवाल एम्सने सीबीआय पुढे सादर केला. एम्सचा अहवाल समोर आल्यानंतर सुरुवातीपासूनच सुशांत प्रकरणात आवाज उठविणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत यांनी ट्विटद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे.

कंगनाने ट्विट केले की, ‘एक तरुण आणि असाधारण व्यक्ती एक दिवस उठून स्वत: ला ठार मारते. सुशांतने असे सांगितले होते की आपल्यावर अत्याचार केला जात आहे आणि त्याचा जीव धोक्यात आला आहे. तो म्हणाला होता की, चित्रपट माफियांनी त्याला बंदी घातली आहे आणि त्रास दिला आहे. त्याच्यावर बलात्काराचा खोटा आरोप करून त्याला मानसिकरीत्या प्रभावित केला होता. हॅशटॅग एम्स

कंगनाने दुसर्‍या ट्वीटमध्ये लिहिले की, आम्हाला काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत.

१. सुशांतसिंग राजपूत मोठ्या प्रॉडक्शन हाऊसमधून त्याच्या वर बंदी आणण्याविषयी अनेकदा बोलला होता. त्याच्याविरुध्द कट रचणारे हे लोक कोण आहेत?

२. मीडियाने त्याच्यावर बलात्कारी असल्याची खोटी बातमी का पसरवली?? महेश भट्ट त्यांचे मनोविश्लेषण का करीत होते?

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’