Take a fresh look at your lifestyle.

कंगना रनौत आणि विक्रम गोखले यांची स्वातंत्र्याची व्याख्या वेगळी असेल; संजय राऊतांचा बेधडक टोला

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच ह्या ना त्या विधानांमुळे चर्चेत असते हे आपण सारेच जाणतो. मात्र यावेळी तिने संपूर्ण देशाचा रोष पत्करून घेतलाय का काय असाच प्रश्न पडत आहे. अलीकडेच कंगनाने एका मुलाखतीत म्हटले कि, १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य हे भीक होती तर २०१४ साली आपलयाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले. या वक्तव्यामूळे संपूर्ण देशभरातून विविध प्रतिक्रिया समोर आल्या. दरम्यान मराठी अभिनेते विक्रम गोखले यांनी कंगनाच्या वक्तव्याचे समर्थन केले आणि हा वाद आणखीच उफाळला. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कंगना आणि गोखले यांची कानउघाडणी केलीच होती. मात्र आज पुन्हा मादझयमांशी बोलताना त्यांनी निशाणा साधला आहे.

शेतकऱ्यांच्या संघर्षापुढे सरकारला झुकावे लागले. शेतकऱ्यांसाठी हा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन आहे. शेतकऱ्यांनी हे स्वातंत्र्य लढून मिळवले आहे. भिकेत मिळाले नाही, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि अभिनेत्री कंगना रनौतला लगावला आहे. आज प्रसार माध्यमांशी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देशातील कृषी कायदे रद्द करण्याविषयी प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले, देशातील शेतकरी दीड वर्षापासून ज्या तणाव, दबाव आणि दहशतीखाली होता. त्याचे जोखड आता निघालेले आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय असते? हे कंगनाला जास्त माहिती आहे का? कंगना रनौत सांगते ते स्वातंत्र्य नाही किंवा विक्रम गोखले म्हणतात ते स्वातंत्र्य नाही. त्यांची व्याख्या वेगळी असेल. तुमच्या मनावरचे जोखड निघून जाते ते स्वातंत्र्य खरे हे म्हणावे लागेल.

पुढे, देशात शेतकऱ्यांच्या विरोधात लादण्यात आलेले तीन काळे कायदे रद्द होत आहेत. शेतकऱ्यांसाठी हा स्वातंत्र्य दिनच आहे. हे स्वातंत्र्य शेतकऱ्यांनी लढून मिळवले आहे त्यांनी ते भिकेत मिळवलेले नाही. शेतकऱ्यांनी वर्षभर केलेल्या आंदोलनात ७०० शेतकऱ्यांनी बलिदान दिले. जालियनवाला बागेत ब्रिटिशांनी आमच्या वीरांना चिरडले. त्याच पद्धतीने लखीमपूर खेरीतही या ईस्ट इंडिया कंपनीच्या लोकांनी शेतकऱ्यांना चिरडून मारले. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या दृष्टीने मला आजची सकाळ स्वातंत्र्याची पहाट वाटतेय, असे राऊत यांनी यावेळी म्हटले आहे.