Take a fresh look at your lifestyle.

विकी- कॅटच्या वयातील अंतरावर कंगना रनौत म्हणाली कि, एका ठराविक वयानंतर..

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि कॅटरिना कैफच्या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु असून हे दोघेही उद्या लग्नगाठ बांधून आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात करणार आहेत. हे बी टाऊन कपल लवकरच बॉलिवूडचे नवे पॉवर होण्यास सज्ज आहे. संगीत, मेहंदीनंतर आज त्यांची हळद पार पडेल आणि उद्या लग्न. एकीकडे त्यांच्या लग्नाची चर्चच सुरु असताना आता दुसरीकडे बॉलिवूडची पंगा गर्ल अभिनेत्री कंगना रनौतने दिलेली प्रतिक्रिया फारच लक्षवेधी ठरतेय. विकी आणि कॅटरिना यांच्या वयात ५ वर्षांचा फरक असून याच्याविषयी कंगनाने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

विकी आणि कॅटच्या लग्नाबाबत अतिशय गोपनीयता राखण्यात आली असून सोशल मीडियावरही त्यांच्या शाही सोहळ्याचे एकही फुटेज, फोटो वा त्यांचा लूक बाहे येणार नाही याची काळजी घेतली जात आहे. अशातच बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने विकी जाणीव कॅटरिनाच्या वयात असणाऱ्या अंतरावर कमेंट केली आहे. माहितीनुसार, विकी कौशल ३३ वर्षांचा आहे. तर कॅटरिना कैफ हि ३८ वर्षांची आहे. यांच्या वयात इतका फरक असून विकी कॅटरिनासोबत लग्न करण्याचा निर्णय घेऊन आनंद आहे हे पाहून बरं वाटलं अश्या पद्धतीची प्रतिक्रिया कंगनाने दिली आहे.

पंगा गर्ल कंगना रनौत हि कॅटरिना कैफ आणि विक्की कौशलच्या वयातील अंतरावर बोलताना म्हणाली की, “लहानाचे मोठे होत असताना आम्ही एक यशस्वी श्रीमंत व्यक्तीचे त्याच्यापेक्षा वयाने कमी असलेल्या स्त्रीसोबत लग्न झाल्याच्या कथा ऐकल्या. एका विवाहित स्त्रीने पतीपेक्षा यशस्वी होणे हे एका पतीसाठी अडचणीचे ठरत असे म्हटले जाते. एका ठरावीक वयानंतर एका स्त्रीने कमी वयाच्या पुरुषासोबत लग्न करण्याचा विचार तर सोडा, लग्न करणचं अशक्य होते. मात्र भारतीय सिनेसृष्टीत श्रीमंत आणि यशस्वी महिलांच्या सेक्सिस्ट मापदंड तोडताना पाहून बरं वाटतयं. पुरुष व महिला लैंगिक रुढीपरंपरा पुन्हा परिभाषित करत असल्याने दोघांचे अभिनंदन.” असे म्हणत कंगना रनौत आपले मत स्पष्ट मांडले आहे.