Take a fresh look at your lifestyle.

पप्पू सेनेला माझ्याशिवाय काहीच दिसत नाही ; ट्विट करून कंगणाने पुन्हा साधला निशाणा

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | अभिनेत्री कंगना राणौत आणि तिची बहीण रंगोली यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कंगना आणि तिची बहिण रंगोली सोशल मीडियाद्वारे धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. त्यामुळे कंगनाच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. यासंदर्भात कंगणाने पुन्हा एकदा ट्विट केलं आहे.

“कोण कोण नवरात्रीमध्ये उपवास करणार आहे? आज नवरात्रीच्या निमित्ताने काढलेले हे फोटो पाहा. मी देखील उपवास ठेवणार आहे. माझ्यावर आणखी एक एफआयआर दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रात पप्पू सेनेला माझ्याशिवाय काहीच दिसत नाही. माझी जास्त आठवण काढू नका. मी लवकरच येतेय.” अशा आशयाचं ट्विट करुन कंगनाने प्रतिक्रिया दिली. या ट्विटच्या माध्यमातून तिने पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे.

वांद्रे कोर्टात कंगनाविरोधात दोन व्यक्तींनी याचिका दाखल केली होती. याचिकेत आरोप करण्यात आला आहे की, कंगना बॉलिवूडमधील हिंदू आणि मुस्लीम कलाकारांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. याशिवाय ती हिंदू-मुस्लीम समुदायात धार्मिक तेढही निर्माण करत आहे. याचिकाकर्त्यांनी कोर्टासमोर पुरावे म्हणून कंगनाचे ट्विट्स आणि व्हिडीओ सादर केले. त्यानंतर कोर्टाने कलम १५६ (३) अंतर्गत एफआयआर दाखल करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.