Take a fresh look at your lifestyle.

शिवसेनेने माझ्या मुलीवर अन्याय केला ; कंगणाच्या आईची शिवसेनेवर टीका

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतच्या मुंबईतील ऑफिस वर मुंबई महानगरपालिकेद्वारे अनधिकृत बांधकामाच्या अंतर्गत कारवाई करण्यात आली. याची नुकसान भरपाई मिळावी म्हणून कंगनाने न्यायालयाने धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाने २२ सप्टेंबरपर्यंत तारीख पुढे ढकलली आहे. या दरम्यान कंगनाची आई आशा राणौत आपल्या मुलीसोबत खंबीरपणे उभी राहिली आहे. त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

माज्या मुलीवर शिवसेनेन अन्याय केला आहे.ही बाळासाहेबांची शिवसेना नाही म्हणत कंगनाच्या आईने शिवसेनेवर टीका केली आहे. महाराष्ट्र सरकारने माझ्या मुलीसोबत चुकीचं केलं आहे. संपूर्ण भारतातील जनता हे अजिबात खपवून घेणार नाही, असं आशा राणौत यांनी म्हटलं आहे.

आशा राणौत यांनी म्हटलंय की, जर कंगना चुकीची असती तर संपूर्ण देश तिच्यासोबत नसतो. ही कसली सरकार आहे. माझी मुलगी त्याच जनतेतील एक आहे, तिच्यासोबत एवढा अन्याय का? याला सरकार म्हणतात का? ही बाळासाहेबांची शिवसेना नाहीच आहे.

आशा रणौत यांनी यावेळी कंगना मुंबईतच राहणार असल्याची माहिती दिली आहे. “कंगना महाराष्ट्रातच राहणार आहे. १५ वर्षांपासून ती मुंबईत असून अर्ध आयुष्य तिने तिथंच घालवलं आहे. महाराष्ट्र हा सर्वांसाठी आहे,” असं त्यांनी म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’