Take a fresh look at your lifestyle.

कंगनाचा जबरदस्त ‘पंगा’; चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

0

हॅलो बॉलिवूड, ऑनलाईन । बॉलीवूडची ‘क्वीन’ कंगना राणावत आणखी एक, तिला साजेसा विषय घेऊन आपल्या समोर येतीय, चित्रपटाचं नाव आहे ‘पंगा’. पहिल्यांदाच ती आईच्या भूमिकेत दिसणार असून, ३२ वर्षांची रिटायर्ड झालेली कबड्डी पट्टू बनली आहे.

ट्रेलर डिकोड करायचा म्हटलं तर, हि एका महिला कबड्डीपट्टूची लग्न आणि मुलानंतर पुन्हा एकदा खेळात कमबॅक करण्याच्या संघर्षाची गोष्ट आहे. ट्रेलरची सुरुवात कंगनाला गृहिणी म्हणून करण्यात आली आहे. ती रोजच्या कामकाजामध्ये आणि रेल्वेच्या कार्यालयात काम करत आहे. हळू हळू आपल्याला तिचा मेन कॉन्फ्लिक्ट कळू लागतो. जस्सी गिल यामध्ये कंगनाच्या नवऱ्याचा रोल करत आहे. त्याने अक्टिंगचा तराजुही तारलेला दिसत आहे.

एका काळी कबड्डी चॅम्पियन म्हणून नावलौकिक मिळवलेली जया खेळाला मिस करत असते. तिच्या छोटा मुलगा आणि पती तिला कबड्डीत पुनरागमना विषयी विचार करण्यास प्रवृत्त करते. त्यांनतर जया पूर्ण ताकदीने टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करते. नीना गुप्तांचाही लक्षवेधी अभिनय आपल्याला पाहायला मिळणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: