Take a fresh look at your lifestyle.

सुशांत आत्महत्या प्रकरण ; अमीर खानच्या मौनावर कंगणाने उपस्थित केल प्रश्नचिन्ह

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने बिहारमध्ये दाखल केलेली एफआयआर योग्य असल्याचे मान्य करत सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. कोर्टाच्या या निर्णयामुळे दीर्घ काळापासून सीबीआय चौकशीची मागणी करत असलेले सुशांतचे कुटुंबीय, समर्थक आणि कोट्यावधी चाहत्यांमध्ये आनंदाची लाट निर्माण झाली आहे.

याच दरम्यान, सुपरस्टार आमिर खानने ज्या प्रकारे या प्रकरणावर आत्तापर्यंत मौन बाळगले आहे त्यावर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. एका मुलाखतीत कंगना रनौत म्हणाली की सीबीआयच्या तपासासाठी फिल्म इंडस्ट्री मधील कोणीही आवाज उठविला नाही. आमिर खानचे नाव घेताना ती म्हणाले की, पीकेमध्ये त्याच्याबरोबर काम करणाऱ्या आमिर खाननेसुद्धा याबद्दल काहीही वक्तव्य केले नाही.

कंगणाने आरोप केला की ही संपूर्ण फिल्म इंडस्ट्री एखाद्या टोळीप्रमाणे काम करते आहे. ती म्हणाले की, आमिर काहीच बोलला नाही, तर अनुष्का शर्मा देखील पूर्णपणे गप्प आहे. आदित्य चोप्रा आणि राणी मुखर्जी यांचेही उदाहरण कंगणाने दिले. कंगना म्हणाली की आपल्या स्वत: च्या उद्योगात काम करणारा सहकारी मरण पावला आणि आपल्याला त्यांबद्दल बोलायला एक शब्दही नाही हे आश्चर्यकारक आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’