Take a fresh look at your lifestyle.

हॉलीवूड अभिनेत्रीने शेअर केला लक्ष्मीदेवीचा फोटो; कंगना म्हणते….

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत आपल्या बेधडक वक्तव्या मुळे सध्या सतत चर्चेत असते.कंगना बॉलिवूड आणि राजकारणासोबतच आध्यात्मावरही आपली मते शेअर करत असते. नुकतंच तिने हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सलमा हायकचं एक ट्विट रिट्विट केलं आहे आणि म्हणाली की, तिला जगाच्या अनेक भागांमध्ये हिंदू देवी-देवतांवर श्रद्धा असणारे लोक भेटले आहेत.

 कंगनाने सलमा हायकचं ट्विट रिट्विट करत लिहिले की, जगाच्या अनेक भागांमध्ये मला अप्रत्यक्षपणे कृष्णा, शिवा आणि देवी भक्त भेटले आहेत. ते कोणत्याही धर्माचे किंवा मूळाचे लोक असो ते भगवान रामावरही प्रेम करतात आणि भगवत गीतेला फॉलो करतात. पण आपल्या देशात काही लोक भक्तीची खिल्ली उडवतात. स्पष्ट आहे की, आपण आस्थेला निवडत नाही तर आस्था आपल्याला निवडते.

दरम्यान, सलमाच्या फॅन्सना तिची ही पोस्ट खूपच लोकप्रिय झाली होती. तिच्या भारतीय फॅन्सना तर जास्तच आनंद झाला होता. बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसुने सुद्धा सलमाच्या पोस्टवर कमेंट करत हे शानदार असल्याचं म्हटलं होतं. सलमासोबतच हॉलिवूडमधील अनेक स्टार्स हिंदू देवी-देवतांवर श्रद्धा ठेवतात. 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’