Take a fresh look at your lifestyle.

पद्मश्री पुरस्कार परत करण्याच्या वाढत्या मागणीवर कंगणाचे प्रत्युत्तर ; म्हणाली की…

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली असल्याचा रिपोर्ट एम्स रुग्णालयामधील टीमने सीबीआयकडे सोपवल्या नंतर सोशल मीडियावर #KanganaAwardWapasKar हा हॅशटॅग भलताच ट्रेण्ड होताना दिसत आहे. ”सुशांतने आत्महत्या केल्याचे आरोप सिद्ध करु शकले नाही, तर मी पद्मश्री पुरस्कार परत करेन”, असं वक्तव्य कंगना रणौतने काही महिन्यांपूर्वी केलं होतं. मात्र, एम्स रुग्णालयाकडून आलेल्या रिपोर्टनंतर सोशल मीडियावर अनेकांनी तिच्याकडे पद्मश्री पुरस्कार परत करण्याची मागणी केली आहे. परंतु, या सगळ्यावर कंगनाने आता प्रत्युत्तर दिले आहे.

स्मरणशक्ती कमी असेल तर ही मुलाखत परत पाहा. जर मी कोणतेही चुकीचे किंवा खोटे आरोप लावले असतील तर माझे सगळे पुरस्कार परत करेन. हे एका क्षत्रिय व्यक्तीचं वचन आहे. मी श्रीरामाची भक्त आहे. प्राण जाए पर वचन न जाए. जय श्री राम”, असं ट्विट कंगनाने केलं आहे. सोबतच तिने त्याच्या मुलाखतीची लिंकदेखील शेअर केली आहे.

सुशांत आत्महत्या प्रकरणी कंगणाने अनेक वादग्रस्त वक्तव्य करत बॉलीवूड मधील घराणेशाही, ड्रग माफिया यांवर भाष्य केले होते. तसेच शिवसेनेवरही टीकास्त्र सोडलं होत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.